विजय बारी यांच्या सुपुत्राची डॉक्टरपदी भरारी; डॉ. जीवन बारी यांचा भाजप कार्यकर्त्यांकडून सत्कार

अमळनेर (प्रतिनिधी) विजय बारी यांचे सुपुत्र डॉ. जीवन बारी यांनी वैद्यकीय पदवी प्राप्त करून डॉक्टर होण्याचा मान मिळविल्याने परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या या यशाबद्दल भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांसह परिसरातील नागरिकांनी त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देत पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला.

या आनंदाच्या प्रसंगी खासदार स्मिताताई वाघ यांनी भ्रमणध्वनीद्वारे डॉ. जीवन बारी आणि त्यांचे वडील विजय बारी यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी डॉ. जीवन बारी यांचे विशेष कौतुक करत वैद्यकीय क्षेत्रातील पुढील कारकिर्दीसाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते सोमा रावजी ठाकूर, दिलीप ठाकूर, गोकुळ सिंग परदेशी, जयवंत पटवर्धन सर, कैलास सोनार, भरत सिंहजी परदेशी, तुळशीरामजी हटकर, सुभाष मामा, शिवा महाजन, ज्ञानेश्वर बारी, गणेश बडगुजर, समाधान पाटील आणि सागर बारी यांच्यासह परिसरातील अनेक नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ. जीवन बारी यांच्या यशामुळे बारी कुटुंबीयांसह परिसरातील नागरिक आणि भाजप परिवारात आनंद व्यक्त करण्यात येत आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *