मंगळग्रह सेवा संस्थेचा ‘माणुसकीची दिवाळी’ उपक्रम; आमोदे येथे ४५ गरजू कुटुंबांना फराळ वाटप

अमळनेर (प्रतिनिधी) दुष्काळजन्य परिस्थितीतही गरजवंतांच्या घरात दिवाळीचा आनंद फुलावा आणि त्यांच्या सणात गोडवा निर्माण व्हावा, या सामाजिक बांधिलकीतून मंगळग्रह सेवा संस्थेने ‘माणुसकीची दिवाळी’ हा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत तालुक्यातील विविध गावांमध्ये जाऊन गरजू कुटुंबांना दिवाळी फराळाचे वाटप केले जात आहे. शनिवारी (दि. ७ नोव्हेंबर) सायंकाळी आमोदे येथे जवळपास ४५ गरजू कुटुंबांना फराळाची पाकिटे वितरित करण्यात आली.

यावेळी आमोदेचे उपसरपंच शुभम राजेंद्र पाटील, माजी सरपंच नामदेव अभिमन पाटील, राजेंद्र पंडित पारधी, राजेंद्र गुलाब पाटील, प्रताप पंडित पारधी, अमृत काशीराम पाटील, भिवराज गोबा पाटील तसेच मंगळग्रह सेवा संस्थेचे उपाध्यक्ष एस. एन. पाटील, मंगल सेवेकरी भानुदास पाटील यांच्यासह गावातील सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते. या उपक्रमासाठी स्थानिक पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी सहकार्य केले.

यावेळी एस. एन. पाटील यांनी मंगळग्रह सेवा संस्थेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर गरजू शेतकरी, शेतमजूर आणि इतर घटकांना फराळ, कपडे व अन्नधान्याच्या स्वरूपात मदत मिळावी, यासाठी दानशूर व्यक्तींनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *