पूरामुळे लांबलेली ‘स्वर-अर्पण’ची सुरेल मैफल अखेर १३ ऑगस्टला अमळनेरमध्ये रंगणार

अमळनेर (प्रतिनिधी) स्व.ओमकार म्युझिकल ऑर्केस्ट्रा, मुंबई प्रस्तुत ‘स्वर-अर्पण’ हा हिंदी व मराठी सुमधुर गीतांचा श्रद्धांजलीपर कार्यक्रम गुरुवार, १३ ऑगस्ट २०२६ रोजी अमळनेरमध्ये रंगणार आहे. पूरपरिस्थितीमुळे ३१ जुलै रोजी नियोजित करण्यात आलेला स्वरोमकार म्युझिकल ग्रुपचा हा बहुप्रतीक्षित कार्यक्रम पुढे ढकलावा लागला होता. मात्र रसिकांच्या प्रेम आणि आग्रहामुळे आता ही सुरेल मैफल पुन्हा एकदा अमळनेरकरांच्या भेटीला येत आहे. हा सांगीतिक कार्यक्रम १३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर, अमळनेर येथे होणार आहे.

‘स्वर-अर्पण’ या सुरांची मैफलीत मनोज वानखेडे, चंद्रकांत बी., शिवानी आणि ऋचा बिरारी हे गायक आपल्या सुमधुर आवाजातून हिंदी व मराठी गीतांची मेजवानी रसिकांना देणार आहेत. करुणा सोनार निवेदिका म्हणून कार्यक्रमाची सूत्रे सांभाळणार असून पूजा नृत्यांगना म्हणून सहभागी होणार आहे. विजय शुक्ल साऊंड मॅनेजर म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत. या कार्यक्रमातून भारतीय संगीतविश्वातील दिग्गज आणि रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या लता मंगेशकर, मोहम्मद रफी, किशोर कुमार आणि आशा भोसले यांना संगीतमय श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे. त्यांच्या अजरामर गीतांची सुरेल मैफल अनुभवण्याची संधी अमळनेरकर रसिकांना मिळणार असल्याने संगीतप्रेमींमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. पूरपरिस्थितीमुळे ३१ जुलैचा नियोजित कार्यक्रम पुढे ढकलावा लागल्यानंतर आयोजकांनी आता १३ ऑगस्टची नवी तारीख जाहीर केली आहे. रसिकांच्या आग्रहामुळे कार्यक्रम पुन्हा आयोजित करण्यात येत असल्याने हिंदी-मराठी गीतांच्या या सुरेल संध्याकाळी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे आयोजन सुनिल वाघ यांनी केले आहे. स्वरोमकार म्युझिकल ग्रुपतर्फे सर्व रसिकांना ‘सुरांची साथ, संगीताची मैफल आणि आपल्या उपस्थितीची अमूल्य साथ’ घेऊन या सुरेल संध्याकाळचा मनमुराद आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. कार्यक्रमासंदर्भात अधिक माहितीसाठी ९३७३६९८५६९ आणि ९९६०४१९२५४ या क्रमांकांवर संपर्क साधता येणार आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *