
अमळनेरातील गोल्डन विंग्ज स्कूलमध्ये रंगले वार्षिक स्नेहसंमेलन
अमळनेर (प्रतिनिधी) येथील गोल्डन विंग्ज स्कूलच्या पूर्वप्राथमिक शाळेचे ३ रे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात झालाे.
चिमुकल्यांनी आपले कलागुण सादर केले. त्यांना पालकांची व शिक्षकांची दाद मिळाली. कार्यक्रमाचे उद्घाटन शहराचे सुप्रसिद्ध डॉक्टर आणि नर्मदा मेडिकल फाउंडेशनचे संचालक मा. डॉ. संदीप जोशी यांच्या हस्ते झाले. प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध चार्टर्ड अकाउंटंट अजय हिंदुजा आणि विपुल गारमेंट्सचे मालक व उद्योजक राजेंद्र कुंदनानी उपस्थित होते. सांस्कृतिक आविष्कार आणि सामाजिक संदेश देत शाळेतील ३ ते ५ वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांनी विविध गाण्यांवर नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. केवळ मनोरंजनच नव्हे, तर ‘मोबाईल फोन आणि सोशल मीडियाचे दुष्परिणाम’ या विषयावर एका उत्कृष्ट नाटिकेद्वारे मुलांनी प्रभावी संदेश दिला. या स्नेहसंमेलनाचे वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांनीच नव्हे, तर पालकांनीही सहभागी होऊन आपले कलागुण सादर केले. वर्षभरात घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमधील विजेत्या विद्यार्थ्यांना व सहभागी पालकांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके व प्रशस्तीपत्रके देऊन गौरविण्यात आले. हे पारितोषिक वितरण डॉ. संदीप जोशी, अजय हिंदुजा आणि उद्योजक राजेंद्र कुंदनानी यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमासाठी बालाजी फाउंडेशनचे अध्यक्ष सतीश बडगुजर, सदस्य दीपक वाच्छानी, हितांशी वाच्छानी, क्रांती बडगुजर तसेच शाळेतील सर्व शिक्षक, पालक व शुभचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply