
भोईवाड्यात रक्तदानातून सामाजिक बांधिलकीचा आदर्श; ५६ रक्तदात्यांचे योगदान!
अमळनेर (प्रतिनिधी) पवनपुत्र गणेश उत्सव मित्र मंडळ, भोईवाडा यांच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात ५६ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचा आदर्श निर्माण केला. या उपक्रमातून रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित करत समाजहितासाठी योगदान देण्याचा संदेश देण्यात आला.
यावेळी डी.वाय.एस.पी. विनायक कोते यांनी रक्तदान करणाऱ्या युवकांचे कौतुक करून त्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले. तसेच मंडळाच्या सामाजिक कार्याचे अभिनंदन केले. पी.आय. दत्तात्रय निकम यांनी युवकांना रक्तदानाविषयी उपयुक्त माहिती देत रक्तदानाचे महत्त्व पटवून दिले. या सामाजिक उपक्रमाचे आयोजन मंडळाचे अध्यक्ष सुदाम भोई आणि स्वप्नील शिंगाणे यांच्या पुढाकाराने करण्यात आले. रक्तदान चळवळीचे प्रमुख मनोज शिंगाणे यांनी, “यापुढेही आपल्या परिसरात सामाजिक कार्य सातत्याने सुरू ठेवणार असून, समाजहितासाठी आम्ही सदैव तत्पर राहू,” असा विश्वास व्यक्त केला. या कार्यक्रमाला उपनगराध्यक्ष प्रशांत निकम, अर्बन बँकेचे रणजित शिंदे, अमेय मुंदडा आणि डॉ. पंकज महाजन यांची विशेष उपस्थिती लाभली. रक्तदान शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी भोईवाड्याचा राजा पवनपुत्र गणेश मंडळाच्या योगेश भोई, सचिन बारी, यश चौधरी, स्वप्नील शिंगाणे, गणेश शिंगाणे, पंकज बाविस्कर, भूषण भोई, प्रवीण शिंगाणे, योगेश राजपूत, अजय शिंगाणे, चेतन कोळी, गुरूदास कोळी, कृष्णा चौधरी, सुनील कोळी, दीपक ढोले, पंकज ढोले, सागर भोई, सागर शिंगाणे, सुकदेव चौधरी, रोहन वडिले, गणेश भोई, राजेंद्र भोई, गंगाराम भोई, जयेश भोई, राकेश शिवदे, देविदास साटोटे, योगेश भोई, गणेश कोळी, ज्ञानेश्वर कोळी, संदीप भोई आणि किशोर शिंगाणे आदी युवकांनी रक्तदान केले.
तसेच जितू कोळी, दिनेश भोई, स्वप्नील कोळी, राजमल शिंगाणे, परशुराम कोळी, उमेश महाजन, राहुल भोई, दिनेश भोई, शशिकांत कोळी, विक्की भोई, भीका कोळी, साई भोई आणि किरण चौधरी यांचेही शिबिराच्या आयोजनासाठी मोलाचे सहकार्य लाभले.
रक्तदान करा — जीवनदान द्या! जनजागृतीतून परिवर्तन आणि सेवेतून समाजाचा विकास, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

Leave a Reply