
मुंबई महापालिकेत शिरूडचे जितेंद्र पाटील यांची उपप्रमुख अभियंता पदावर पदोन्नती
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील शिरूड गावाचे रहिवासी तथा मुंबई महानगरपालिकेच्या अभियांत्रिकी विभागात कार्यरत जितेंद्र जिजाबराव पाटील यांची उपप्रमुख अभियंता पदावर पदोन्नती झाली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे शिरूड गावाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या अभियांत्रिकी विभागात कार्यरत असताना जितेंद्र जिजाबराव पाटील यांनी अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण केले आहेत. विशेषतः पाणीपुरवठा प्रकल्पांचे नियोजन, संशोधन, आराखडा तयार करणे आणि बांधकाम, जलवितरण व्यवस्थापन, पाणी शुद्धीकरण केंद्रांचे प्रभावी व्यवस्थापन, जलवितरण व्यवस्था अधिक सक्षम करणे तसेच रस्ते बांधकाम आणि विविध पायाभूत सुविधा विकसित करण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली आहे.
प्रदीर्घ अनुभव, तांत्रिक ज्ञान, दूरदृष्टी आणि समर्पित कार्यशैलीच्या बळावर त्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना यश मिळवून दिले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या कामांमुळे नागरिकांना अधिक दर्जेदार सुविधा उपलब्ध होण्यास मदत झाली असून अभियांत्रिकी क्षेत्रात त्यांनी स्वतंत्र ठसा उमटविला आहे. उपप्रमुख अभियंता पदावरील पदोन्नतीमुळे मुंबई महानगरपालिकेला अनुभवी आणि सक्षम नेतृत्व लाभणार असल्याची भावना व्यक्त होत आहे. आगामी काळातही नागरिकाभिमुख, दर्जेदार आणि आधुनिक पायाभूत सुविधा उभारण्यात जितेंद्र जिजाबराव पाटील यांचे महत्त्वपूर्ण योगदान राहील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल शिरूडसह अमळनेर तालुक्यातील नागरिक, सहकारी, मित्रपरिवार आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Leave a Reply