मंगरुळ येथे तरुणांना मोफत एआय व संगणक प्रशिक्षण

ग्रामपंचायतीसह एचएएल, आयसेट यांच्या संयुक्त विद्यमाने उपक्रम

 

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील मंगरूळ येथील ग्रामपंचायतीसह एचएएल, आयसेट यांच्या संयुक्त विद्यमाने १८ ते ३५ वर्षीय युवकांना पाच दिवस मोफत एआय व संगणक प्रशिक्षण देण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची परिस्थिती सर्वसाधारण असल्याने त्यांना संगणक अथवा एआय तंत्रज्ञान शिकण्यासाठी सुविधा उपलब्ध होत नाही अथवा परवडत नाही. म्हणून एचएएल कंपनीने सीएसआर फंडातून मोफत प्रशिक्षण उपक्रम सुरू केला आहे. महाराष्ट्रातील हा पहिला प्रयोग असून शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या परवानगीने सरपंच समाधान पारधी यांच्या मागणीनुसार मंगरूळ येथे  २५ संगणक असलेली विशेष व्हॅन उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोबत मार्गदर्शन करण्यासाठी  तंत्रज्ञ उपलब्ध करून देण्यात आले आहे. दररोज ५० मुली प्रशिक्षण घेत आहेत.या प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन प्रसंगी गटविकास अधिकारी एन. आर. पाटील, सरपंच समाधान पारधी, ग्रामविकास अधिकारी कैलास जाधव, विस्तार अधिकारी सुरेश कठळे, संजीव पाटील, योगेश पाटील, अरुण घोलप उपस्थित होते. ग्रामीण विद्यार्थ्यांना मोफत संगणक व एआय तंत्रज्ञान अवगत होत असल्याने त्यांनी या उपक्रमाचा आनंद व्यक्त केला आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *