अमळनेरात रविवारी बाबा रामदेवजी महाराज जन्मोत्सवाचा जल्लोष

अमळनेर (प्रतिनिधी) शहराच्या पावन पुण्यधरेवर कलियुग अवतारी भगवान श्री बाबा रामदेवजी महाराज यांचा पावन जन्मोत्सव रविवारी, दि. १३ सप्टेंबर रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त श्री पगल्या पूजन व महाभिषेकासह भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

अमळनेर येथील श्री द्वारकाधीश बाबा रामदेवजी भक्त मंडळ यांच्या वतीने या भव्य उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये भव्य दरबार, श्री पगल्या पूजन महाभिषेक, भव्य शोभायात्रा, जन्मोत्सव महाआरती आणि प्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. या सोहळ्यास पं. पूज्य रामदेवजी शर्मा (बापजी कलमसरा) यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. सकाळी ७.३१ वाजता श्री पगल्या पूजन महाभिषेक होईल. त्यानंतर सकाळी ८.३१ वाजता भव्य शोभायात्रेला सुरुवात होणार आहे. सकाळी १० वाजता भव्य जन्मोत्सव महाआरती होणार आहे. हा धार्मिक सोहळा श्री महादेवजी मंदिर, भागवत रोड, अमळनेर येथे होणार आहे. या भव्य व पावन सोहळ्याचा लाभ सर्व श्रद्धाळू भक्तांनी सहकुटुंब व इष्टमित्रांसह घ्यावा तसेच शोभायात्रेत सहभागी होऊन तिची शोभा वाढवावी आणि पुण्याचे भागीदार व्हावे, असे आवाहन श्री द्वारकाधीश बाबा रामदेवजी भक्त मंडळ, अमळनेर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *