अमळनेरात जेईई, नीट, सीईटी गुणवंतांचा उद्या सन्मान

अमळनेर (प्रतिनिधी) मराठा सेवा संघ, अमळनेर यांच्या वतीने जेईई व नीट परीक्षेत उत्तुंग यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा तसेच दहावी, अकरावी व बारावीच्या विद्यार्थी आणि पालकांसाठी जेईई, सीईटी, नीट परीक्षांसंदर्भात विशेष करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शनिवार, दि. १२ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता आयएमए सभागृह, जी. एस. हायस्कूल, अमळनेर येथे होणार आहे.

कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक व व्याख्याते म्हणून प्रा. शरद पाटील (विद्युत अभियांत्रिकीतील पदव्युत्तर, विद्युत अभियांत्रिकी विभागप्रमुख, पुणे; संस्थापक संचालक, व्हिजन ॲडमिशन अँड करिअर कन्सल्टन्सी, पुणे) उपस्थित राहणार आहेत. ‘जेईई, सीईटी, नीट परीक्षेची तयारी व मानसिक व्यवस्थापन’ या विषयावर ते विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी प्रा. डॉ. लिलाधर पाटील लिखित आणि महात्मा फुले यांच्या २००व्या जयंतीनिमित्त आयोजित ‘सत्यशोधक मेळा’ या कलापथकाचे १० मिनिटांचे सादरीकरण होणार आहे. कार्यक्रमास विद्यार्थी, पालक आणि समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मराठा सेवा संघ परिवारातर्फे करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी अध्यक्ष अशोक पाटील, सचिव बापूराव ठाकरे, कार्याध्यक्ष निंबाजी पाटील, उपाध्यक्ष योगेश भदाणे, उद्योजक कक्ष अध्यक्ष दीपक पाटील, पत्रकार कक्ष प्रमुख उमेश काटे, जिजाऊ ब्रिगेड अध्यक्षा वैशाली शेवाळे, शहराध्यक्ष डॉ. कुणाल पवार तसेच सर्व ज्येष्ठ पदाधिकारी व कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *