अमळनेर तालुक्यात ‘आदिवासी क्रांती दल’ची ताकद वाढली; गांधली व देवगाव देवळी येथे फलक अनावरण उत्साहात

अमळनेर (प्रतिनिधी): आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि घटनात्मक हक्कांच्या रक्षणासाठी कार्यरत असलेल्या ‘आदिवासी क्रांती दल’ संघटनेने अमळनेर तालुक्यात आपली पकड अधिक मजबूत केली आहे. संघटनेच्या वतीने गांधली व देवगाव देवळी येथे फलक अनावरण व मार्गदर्शन कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले.

या कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थापक अध्यक्ष मा. बाबासाहेब बोरसे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, “आदिवासी समाज अजूनही विकासाच्या मुख्य प्रवाहापासून दूर आहे. शासनाच्या विविध योजना त्यांच्या पर्यंत पोहोचवणे आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी लढा उभारणे, हेच संघटनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे.” कार्यक्रमात उमाताई भिल, पत्रकार प्रवीण बैसाणे आणि माजी मुख्याध्यापक एस. बी. बैसाणे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत स्वावलंबनाचा संदेश दिला.

गांधली येथे शाखाध्यक्ष सतीश पारधी यांच्या पुढाकारातून कार्यक्रम यशस्वी झाला, तर देवगाव देवळी येथे शाखाध्यक्ष सुरेशभाऊ भिल यांच्या नेतृत्वाखाली आयोजन करण्यात आले. दोन्ही ठिकाणी आदिवासी बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. गांधली येथे सामाजिक कार्यकर्ते महेंद्र पाटील यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाला मुकेशभाऊ नेतकर, रमेशभाऊ पवार, स्वामीभाऊ कोळी, तालुकाध्यक्ष आप्पासाहेब दाभाडे, संतोषभाऊ संदानशिव, दयाराम मोरे, विनोद मोरे, प्रकाशभाऊ सोनवणे, सुदाम वाघ, कविता पवार, बबलू पवार, कल्याणी दाभाडे, कविता मोरे, गणपत दाभाडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तालुकाध्यक्ष आप्पासाहेब दाभाडे व सर्व शाखाध्यक्षांनी विशेष परिश्रम घेतले. आगामी काळात संपूर्ण तालुक्यात संघटनात्मक दौरे राबवून आदिवासी समाजाला अधिक संघटित करण्याचा निर्धार संघटनेने व्यक्त केला आहे.

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *