
अमळनेरात सामाजिक संघटनानी व्हॅलेंटाईन डे काळा दिवस म्हणून साजरा करीत तरूणांना दिला देशप्रेमाचा संदेश
अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील विविध सामाजिक संघटनानी तिरंगा चौकात व्हॅलेंटाईन डे साजरा न करता शहरात काळा दिवस साजरा करून तरूणांना देशप्रेमाचा संदेश दिला.
खान्देशी रक्षक संघटना, आजी माजी सैनिक संघटना, वीर नारी महिला मंडळ यांनी पुढाकार घेत व्हॅलेंटाईन डे साजरा न करता काळा दिवस साजरा करून तरूणांना देशप्रेमाचा संदेश दिला. या वेळी पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांना उपस्थित मान्यवरांकडून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. याठिकाणी अमर जवानाचे (तातपुर्ते) स्मारक उभारण्यात आले. आणि देशभक्तीपर गीत गायन करून शहरात देश प्रेमाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी उपस्थित पोलीस प्रशासनतर्फे पीआय दत्तात्रय निकम, पत्रकार जितेंद्र ठाकूर, मुन्ना शेख तसेच नानाभाऊ धनगर, यांच्यासह असंख्य नागरिक व महीला आणि तालुक्यातील खान्देशी रक्षक संघटना,व आजी माजी सैनिक संघटनेचे जवान, शिवदास शेटे, ईश्वर चौधरी लक्ष्मण बोढरे,जयदीप राजपूत, जगदीश पाटील, नरेंद्र पाटील, नामदेव यादव, हेमंत पाटील, आत्माराम बडगुजर, सोपान महाले, नितीन देवरे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित महीला मंडळ यांच्या आवाजात सामूहिक राष्ट्रगीत गायिले, आणि खान्देश रक्षक संघटनेचे अध्यक्ष विजय सूर्यवंशी यांनी पुलवामा हमल्यातील शहीद जवानांविषयी माहिती देत सूत्रसंचालन केले. आभार धनराज पाटील यांनी मानले.

Leave a Reply