
श्री साई गजानन मंडळातर्फे सद्गुरु गजानन महाराजांचा प्रकट दिन साजरा
अमळनेर (प्रतिनिधी) श्री साई गजानन मंडळातर्फे समर्थ सद्गुरु गजानन महाराज यांचा १४८ वा प्रकट दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले. या वेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सकाळी सहा वाजेपासून लघु रुद्र पूजा सुरुवात करण्यात आली. पूजेस शिरीष दहाडे व योगिता दहाळे या दांपत्याने सुरुवात केली. नंतर मंडळाचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील यांनी महापूजा केली व नऊ वाजता भव्य शोभा यात्रा काढण्यात आली. शोभा यात्रेसाठी घोड्यांची सजावट करून त्यावर बालकांना विराजमान केले होते. माऊलींची पालखी सोहळा पुढे डीजे व बँड पथक सर्व महिला भगिनी व सर्व गजानन भक्तांनी फेटे बांधून मिरवणुकीत सहभाग नोंदवला. ॲड. विंचुरकर यांच्या घरी पूजन करण्यात आले. पुढे पालखी सोहळा योगेश मुकुंद बाग यांच्याकडे गजानन महाराजांचा प्रगट दिवस साजरा केला जातो त्या ठिकाणी पालखी नेण्यात आली. तिथं विधिवात पूजा करण्यात आली. तेथून कचेरी मार्गे पालखी सोहळा मूळ ठिकाणावर पोहोचली. त्या ठिकाणी सत्संगासाठी माँ जिजाऊ महिला ज्येष्ठ नागरिक मंडळ, आहीर सुवर्णकार समाज महिला मंडळ,, खास करून रामचंद्र आबासाहेब मोहाडीहुन आलेले व श्री साई गजानन सेवा मंडळाचे वादक अनिल पाटील, वानखेडे भाऊसाहेब तसेच ए. टी. पाटील, रमेश सैंदाणे, डी. ई. पाटील, आर. व्ही. पाटील, साळुंखे बापू, माँ जिजाऊ महिला मंडळाच्या रजनीताई, भिकन पाटील, संदीप पाटील, गुणवंत पवार, योगेश भाऊ ठिबकवाले, योगेश बाग, गणेश बोढरे, जितेंद्र बोरसे, राजेंद्रशिंग पाटील, एच. आर. पाटील, खैरनार सर, पवार सर, दहाळे सर, एस. एम. पाटील, लक्ष्मण दादा यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास उपनगराध्यक्ष प्रशांत निकम, तसेच जणवास्तवचे किरण पाटील तसेच पीएनबीचे शाखा अधिकारी, मोहाडीकर रामचंद पाटील यांना मंडळाचे वतीने सन्मानित करण्यात आले. अनेक मान्यवरांनी कार्यक्रमास भेटी दिल्या. महाराजांच्या दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. अतिशय हर्ष उल्लासात माऊली गजाननचा प्रगट दिवस साजरा होत असताना प्रगटदिनी आश्रम शाळेतील ४०० विद्यार्थ्यांना व इतर भक्तगण असे मिळून ९०० लोकांचे अन्नदान करण्यात आले.

Leave a Reply