
जिल्हा परिषद अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अमळनेर तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा रंगल्या
अमळनेर (प्रतिनिधी) जिल्हा परिषद अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा उत्साहात झाल्या. यात पं.स.अधिकारी, शिक्षक, ग्रामसेवक व आरोग्य, बांधकाम, पाणी पुरवठा, स्थानिक कार्यालय कर्मचारी यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
अमळनेर तालुकास्तरीय जि.प.अधिकारी, कर्मचारी व शिक्षक क्रीडा स्पर्धांचे आयोजन शहरातील तालुका क्रीडा संकुल येथे क्रिकेट, रस्सीखेच, रनिंग, कॅरम, बुध्दीबळ, प्रताप महाविद्यालय अमळनेर येथे बॅडमिंटन, व्हॉलीबॉल व स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल अमळनेर येथे सांस्कृतिक गायन, नृत्य व नाटिका सादर करण्यात आल्या. खासदार स्मिताताई वाघ व माजी मंत्री तथा आमदार अनिलदादा पाटील यांच्या मार्गदर्शन व प्रेरणेने अमळनेर येथील भव्य व सुसज्ज अशा तालुका क्रीडा संकुलमध्ये प्रथमच जि.प.अधिकारी/कर्मचारी तालुका स्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेची सुरुवात एकाच वेळी बॅडमिंटन, रनिंग व कॅरम या क्रीडा प्रकारांनी गटविकास अधिकारी एन.आर.पाटील, गटशिक्षणाधिकारी प्रमोद पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.गिरीष गोसावी, शिक्षण विस्तार अधिकारी रावसाहेब पाटील, गटसमन्वयक रवींद्र पाटील, केंद्रप्रमुख शरद सोनवणे, चंद्रकांत साळुंके, किरण शिसोदे, अशोक सोनवणे, दिलीप सोनवणे, राजेंद्र गवते, सुनील चौधरी व छगन पाटील यांचे प्रमुख उपस्थितीत करण्यात आली.या स्पर्धांचे नियोजन व व्यवस्थापन यासाठी तालुका क्रीडा समिती अध्यक्ष तथा गटविकास अधिकारी एन.आर.पाटील व सचिव तथा गटशिक्षणाधिकारी प्रमोद पाटील यांचे मार्गदर्शनाखाली स्पर्धा समन्वयक म्हणून उपशिक्षक दत्तात्रय सोनवणे, विलास मोरे, डॉ. कुणाल पवार, क्रीडा समन्वयक म्हणून क्रीडा शिक्षक सुनिल वाघ, कैलास बाविस्कर तसेच स्पर्धा संयोजक म्हणून साधन व्यक्ती देवेंद्र पाटील यांनी काम पाहिले. पंच/परीक्षक म्हणून सुनिल वाघ, कैलास बाविस्कर, बापुराव सांगोरे, स्वप्निल पाटील, जयेश मासरे, गोकुळ बोरसे, अतुल बोरसे, सॅम शिंगाणे, जितेंद्र बाविस्कर, सुनिल करंदीकर, रामेश्वर घुगे, महेश माळी, दर्शन पाटील, कृष्णा वर्मा, राहुल भावसार, महेश्वर बोरसे, पुरब निकम, विजया गायकवाड व संगिता बाविस्कर यांनी जबाबदारी सांभाळली. स्पर्धेचे नियोजन व आयोजन साठी दत्तात्रय सोनवणे, सुनिल वाघ, विलास मोरे, डॉ.कुणाल पवार, अरुण मोरे, डॉ. अतुल चौधरी, चंद्रकांत पाटील, प्रवीण पाटील, ज्ञानेश्वर कुवर, प्रशांत पाटील, सुधीर चौधरी, साधन व्यक्ती देवेंद्र पाटील, प्रमोद पाटील व तुषार बाविस्कर यांचे विशेष सहकार्य लाभले.
स्पर्धेचा क्रीडा प्रकार निहाय निकाल असा
रनिंग (पुरुष) : विजेता अजय बोरसे (शिक्षण), उपविजेता अक्षय पाटील (बांधकाम), रनिंग (महिला) : विजेता – रुपाली पाटील (शिक्षण), उपविजेता – रोहिणी पाटील (शिक्षण). रस्सीखेच (पुरुष): विजेता बांधकाम विभाग, उपविजेता – आरोग्य विभाग, रस्सीखेच (महिला) : विजेता शिक्षण विभाग. क्रिकेट (पुरुष) : विजेता – बांधकाम विभाग, उपविजेता – आरोग्य विभाग, बुध्दिबळ (पुरुष) : विजेता दीपक बोरसे (बांधकाम) उपविजेता संजय महाजन (शिक्षण), बुध्दिबळ (महिला) : विजेता मंगल नागरे (शिक्षण). कॅरम (पुरुष) : विजेता संजय महाजन (शिक्षण), उपविजेता सागर नराल (आरोग्य). बॅडमिंटन (पुरुष) : विजेता डॉ. गिरीष गोसावी (आरोग्य), उपविजेता संजय जगताप (शिक्षण). बॅडमिंटन (महिला) : विजेता डॉ. साक्षी बोरसे (आरोग्य), उपविजेता कविता पाटील (शिक्षण). सांस्कृतिक विभाग : गायन (पुरुष) : प्रथम सोमनाथ विसपुते (शिक्षण), द्वितीय चंद्रकांत पाटील (शिक्षण), तृतीय प्रेमराज पवार (शिक्षण). नृत्य (महिला) : प्रथम डॉ.पूजा वाघुले/पंजवाणी (आरोग्य), नाटिका (पुरुष) : प्रथम योगेश कापडणे (आरोग्य).

Leave a Reply