अमळनेर मराठा समाज महिला मंडळाचा महिला दिन व पदग्रहण सोहळा उत्साहात

अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर मराठा समाज महिला मंडळाच्या वतीने ८ मार्च जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर २२ मार्च रोजी महिला दिन व पदग्रहण सोहळ्याचे आयोजन उत्साहात करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्या रेखाताई पाटील, संस्थापक अध्यक्षा तिलोत्तमा पाटील, संचालिका जयश्री पाटील, अध्यक्षा शीला पाटील व संचालिका यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली.

यावेळी संस्थापक अध्यक्षा तिलोत्तमा पाटील यांनी प्रास्ताविकात मंडळाच्या दहा वर्षांच्या प्रवासाचा आढावा घेतला. मराठा समाजातील महिलांना व्यासपीठ मिळावे व त्यांच्या सर्वांगीण विकासाला हातभार लागावा या उद्देशाने मंडळाची स्थापना करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. चोपडा येथील पंकज महाविद्यालयाच्या मुख्याध्यापिका रेखाताई पाटील यांनी बदलत्या काळातील पालकांची जबाबदारी, तसेच मराठा समाजातील विवाह व्यवस्था आदी विषयांवर मार्गदर्शन केले. मंडळाच्या खजिनदार पद्मजा पाटील यांनी मागील वर्षाचा आर्थिक व कार्यक्रम अहवाल सादर केला. माजी अध्यक्षा शीला पाटील यांनी मनोगत व्यक्त केले, तर नवनिर्वाचित अध्यक्षा सुलोचना पाटील यांनी सर्वांचे आभार मानत पुढील वर्षीही विविध उपक्रम राबविण्याचा संकल्प व्यक्त केला.

मंडळाच्या परंपरेनुसार महिला दिनानिमित्त वर्षभरात उल्लेखनीय कार्य केलेल्या व विविध पदांवर निवड झालेल्या मराठा समाजातील महिलांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये पिंपळे येथील सरपंच वर्षा पाटील, नवनिर्वाचित नगरसेविका जयश्री पाटील व स्वप्ना पाटील, काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुलोचना वाघ, खा.शी. मंडळात निवडून आलेल्या संचालिका लीना पाटील व उपाध्यक्षा माधुरी पाटील यांच्यासह कामिनी पवार, सुनीता पाटील, अनिता काळे, पूजा पाटील, रजनी पाटील, पद्मजा पाटील, डॉ. भारती पाटील, रूपाली पाटील, पल्लवी पाटील, योगेश्वरी पाटील, श्वेता पाटील, डॉ. प्रा. नलिनी पाटील, वैशाली निकम, ज्योती पाटील, सुदर्शना पाटील, माधुरी देशमुख, सुवर्णा पाटील, वैशाली पाटील, राणी लक्ष्मीबाई ग्रुपच्या ज्योती पवार, माधुरी पाटील, पूर्वा देसले, पूनम पाटील, मनीषा महाले यांचा प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारती पाटील, मनीषा पाटील व रागिनी महाले यांनी केले. कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन लीना पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन माधुरी पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सुनीता पाटील व प्रभा पाटील यांनी विशेष प्रयत्न केले.

 

मंडळाची कार्यकारिणी अशी

 

मंडळाच्या नव्या कार्यकारिणीची निवड जाहीर करण्यात आली. अध्यक्षपदी सुलोचना पाटील, उपाध्यक्षा म्हणून मंगल पाटील व भारती पाटील (डी. आर. कन्या शाळा), सचिवपदी कमल अक्का पाटील, तर खजिनदारपदी भारती पाटील (आधार संस्था) यांची २०२६ वर्षासाठी निवड करण्यात आली. कार्यकारिणी सदस्य म्हणून स्वप्ना पाटील, राजश्री पाटील, सविता आहेर, प्रा. नलिनी पाटील, गायत्री भदाणे, कृपाली पाटील व दीपिका सोनवणे यांची निवड करण्यात आली.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *