अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर पकडला; ४ लाखांचा मुद्देमाल जप्त

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यात अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर पोलिसांनी कारवाई करत वाळूसह ट्रॅक्टर असा सुमारे ४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई २५ रोजी पहाटे २:१५ वाजेच्या सुमारास पातोंडा गावाजवळ अमळनेर रस्त्यावर करण्यात आली.

याबाबत अधिक माहिती अशी की, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शरद काकळीज, हेडकॉन्स्टेबल मिलिंद सोनार, कैलास शिंदे व विनोद संदानशिव हे पथक पेट्रोलिंग करत असताना समोरून येणाऱ्या ट्रॅक्टरवर संशय आल्याने त्यांनी वाहन अडवले. तपासणी केली असता ट्रॅक्टर क्रमांक एमएच-१९ एपी ८८३२ हा निलेश रुपचंद बारेला (रा. दुगणी, ता. वरला, जि. बडवाणी, मध्यप्रदेश) चालवत असून तो बेकायदेशीररित्या वाळू वाहतूक करत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी चालकाकडे वाळू वाहतुकीचा परवाना मागितला असता त्याच्याकडे कोणताही वैध परवाना नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पोलिसांनी तत्काळ कारवाई करत ट्रॅक्टरसह वाळू जप्त केली. याप्रकरणी चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३०३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हेडकॉन्स्टेबल विजय भोई करीत आहेत. या कारवाईमुळे अवैध वाळू वाहतुकीवर आळा बसण्यास मदत होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *