
अमळनेरात रवी नगरात मोकळ्या भूखंडाला आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला
अमळनेर (प्रतिनिधी ) येथील धुळे रोडवरील रवी नगर परिसरात रविंद्र बोरसे यांच्या घराशेजारील मोकळ्या भूखंडाला रविवारी दुपारी अचानक आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. नागरिकांनी सुरुवातीला पाणी टाकून आग विझविण्याचा प्रयत्न केला, मात्र उन्हाळा आणि कोरड्या हवामानामुळे आग वेगाने पसरत होती. सुदैवाने नगरपालिकेच्या अग्निशमन दलाने वेळेत धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविल्याने मोठा अनर्थ टळला.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, दुपारी सुमारे ४ वाजेच्या सुमारास रवी नगर येथे मोकळ्या प्लॉटमध्ये अचानक आग भडकली. परिसरात कोरडे गवत व झुडपे मोठ्या प्रमाणात असल्याने आग झपाट्याने वाढू लागली. स्थानिक रहिवाशांनी तत्काळ पाण्याच्या साहाय्याने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यात यश आले नाही. त्यानंतर नगरपालिकेच्या अग्निशमन विभागाला माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच अमळनेर नगरपालिकेने तातडीने दोन अग्निशमन बंब घटनास्थळी रवाना केले. फायरमन आकाश संदानशिव आणि मुन्ना धनगर यांनी प्रसंगावधान राखत अथक प्रयत्नांनी आगीवर नियंत्रण मिळविले. त्यांच्या तत्परतेमुळे आग रहिवासी भागात पसरण्यापासून रोखली गेली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याने नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
दरम्यान, या घटनेनंतर रवी नगर परिसरातील नागरिकांनी नगरपालिकेकडे मोकळ्या भूखंडांची तातडीने साफसफाई करण्याची मागणी केली आहे. परिसरात अनेक रिकामे प्लॉट असून तेथे मोठ्या प्रमाणात वाढलेले गवत व झुडपे उन्हाळ्यात कोरडे होऊन आगीस कारणीभूत ठरत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
“आजची आग ही कोरड्या झुडपांमुळेच भडकली. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी नगरपालिकेने मोकळ्या प्लॉटवरील झाडे-झुडपे हटवून परिसर स्वच्छ ठेवावा,” अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. तसेच कायमस्वरूपी उपाययोजना

Leave a Reply