गीता परिवाराच्या बाल संस्कार शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; मुलांमध्ये संस्कार व नैतिक मूल्यांची रुजवण

अमळनेर (प्रतिनिधी) गीता परिवाराच्या प्रेरणेने व उर्मिला जगदीश अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली अमळनेर दुसरे बाल संस्कार शिबिर उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. लिनेस क्लब ऑफ अमळनेर आणि गीता परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

आजच्या संगणक, मोबाईल आणि इंटरनेटच्या युगात जग जवळ आले असले तरी मुलांमध्ये संस्कारांची उणीव प्रकर्षाने जाणवत आहे. विभक्त कुटुंब पद्धती तसेच दोन्ही पालक करिअरच्या धावपळीत व्यस्त असल्यामुळे मुलांच्या जडणघडणीसाठी पुरेसा वेळ देता येत नाही. या पार्श्वभूमीवर मुलांमध्ये नैतिक मूल्ये, देशभक्ती, शिस्त आणि चांगले संस्कार रुजविण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराला पालक व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शिबिरामुळे मुलांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळत असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. विविध उपक्रम, मार्गदर्शन व संस्कारमूल्यांवर आधारित सत्रांमुळे विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक बदल घडून येण्यास मदत होत असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी लिनेस क्लबच्या , कविता पारख, जास्मिन भरूचा तसेच, वनश्री अमृतकर, सुनीता करंजे, गंगा अग्रवाल, अर्चना शर्मा, ॲड. भारती अग्रवाल व पद्मजा पाटील यांनी मोलाचे सहकार्य केले. आयोजकांनी सर्व सहकाऱ्यांचे आभार मानले.

शिबिरासाठी सभागृह उपलब्ध करून दिल्याबद्दल यांचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले. दरम्यान, शिबिराला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे भविष्यातही अशी संस्कार शिबिरे वारंवार आयोजित करावीत, अशी मागणी पालक व नागरिकांकडून करण्यात आली असून आयोजकांनीही त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *