“वक्ता हा जन्मत नाही, घडविला जातो” – प्रा. डॉ. राहुल निकम

राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त अमळनेरमध्ये युवा वक्त्यांची कार्यशाळा उत्साहात

अमळनेर (प्रतिनिधी) राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त युवा कल्याण प्रतिष्ठान, अमळनेर यांच्या वतीने युवा वक्त्यांसाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत सुमारे १०० युवा वक्ते सहभागी झाले असून, ते लवकरच शाळांमध्ये जाऊन जनतेचे सेवक व सत्यशोधक विचारांचे प्रेरणास्थान असलेल्या राजर्षी शाहू महाराजांच्या कार्यावर भाषण देणार आहेत.

कार्यशाळेत मार्गदर्शन करताना प्रा. डॉ. राहुल निकम यांनी “वक्ता हा जन्मत नाही तर घडविला जातो” असे प्रतिपादन करत प्रभावी वक्तृत्वासाठी सातत्यपूर्ण अभ्यास, सराव आणि सामाजिक जाण आवश्यक असल्याचे सांगितले. तसेच प्रा. डॉ. लीलाधर पाटील यांनीही उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवा कल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. अशोक पवार यांनी केले, तर डी. ए. पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

यावेळी सुनिता मोरे यांनी लिहिलेल्या राजर्षी शाहू महाराजांच्या कार्यावरील गीताचे सादरीकरण अनिता संदानशिव, भारती कोळी, माधुरी पाटील, निवेदिता कापडणेकर व डी. ए. पाटील यांनी केले. तसेच सोपान भवरे लिखित राजर्षी शाहू महाराजांचे जीवन व कार्य यावरील वाचन साहित्य सर्व सहभागी वक्त्यांना वितरित करण्यात आले.

कार्यशाळेला मुख्याध्यापिका अनिता बोरसे, रामेश्वर भदाणे, अशोक बिऱ्हाडे, संजय पाटील, चंद्रकांत देसले, प्रा. सुनील वाघमारे, बापूराव ठाकरे, मिलिंद निकम, अशोक केशवराव पाटील, अतुल डोळस, अजय भामरे, सुनील वाघमोडे आदी मान्यवर उपस्थित होते.

या कार्यशाळेमुळे युवकांमध्ये वक्तृत्व कौशल्यासोबत सामाजिक जाण आणि प्रेरणादायी विचारांची रुजवण होणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *