चिमनपुरी पिंपळे खु. परिसरातून भुरटे चोर सक्रीय, पाण्याची मोटर व वायरी चोरीला

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील चिमनपुरी पिंपळे परिसरात पुन्हा एका भुरट्या चोरांनी डोकेवर काढले असून मोटर व वायरी चोरीला जात आहेत. पिंपळे आरडी रस्त्यावरती रस्त्यालगत शेतामध्ये सौर ऊर्जा पंप मोटर व वायर लंपास केली आहे. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, तालुक्यातील पिंपळे येथील दाजीबा अर्जुन पाटील (वय ७३) राहातात. २१ मार्च रोजी पहाटे अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गट नंबर८७/२ शेतातील विहिरी मधून इकोझेन सोल्युशन्स पीव्हीटी कंपनीची ३ एचपीडीसी पाण्याची मोटर चोरून नेली. सकाळी उठल्यावर तेशेतात गेल्यानंतर निदर्शनास येताच दाजीबा अर्जुन पाटील यांनी संपूर्ण परिसरात आणि ओळखीच्या ठिकाणी शोध घेतला. मात्र, शोध घेऊनही  सौर ऊर्जेची पंपाची मोटर  मिळून न आल्याने अखेर त्यांनी २१ मार्च रोजी पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. या घटनेचा तपास अमलदार कैलास शिंदे करण्यात  असून सर्व बाबी व शक्यता तसेच सौसीटीव्ही पडताळण्यात येत आहेत.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *