कळमसरे जिल्हा बँकेचा ठराव मधुकर यशवंत पाटील यांच्या नावाने बिनविरोध

अमळनेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील कळमसरे येथील विविध कार्यकारी सोसायटीचा जिल्हा बँकेचा ठराव सभासद मधुकर यशवंत पाटील यांच्या नावाने बिनविरोध करण्यात आला. मधुकर यशवंत पाटील हे पत्रकार बाबुलाल यशवंत पाटील यांचे मोठे बंधू आहेत. त्यांच्या बिनविरोध निवडीबद्दल गावासह परिसरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

कळमसरे येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या माध्यमातून जिल्हा बँकेच्या ठरावासाठी मधुकर यशवंत पाटील यांच्या नावाला सभासदांनी एकमताने पसंती दिली. त्यामुळे हा ठराव बिनविरोध झाला. या वेळी विविध कार्यकारी सोसायटीचे पदाधिकारी, संचालक तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.

यावेळी मा. शेतकीसंच प्रेसिडेंट व संचालक पिंटू राजपूत, चेअरमन जयदीप प्रकाश पाटील, मा. चेअरमन संचालक बाबुलाल यशवंत पाटील, रमेश चिंधा चौधरी, सुनिल देवनाथ पाटील, मा. व्हा. चेअरमन अशोक हिलाल चौधरी, नरेंद्रसिंग गुलाब सिंग पाटील, संचालक दिपचंद ईंदरचंद छाजेड, जग्नाथ रामदास चौधरी, संचालिका श्रीमती शोभाबाई कौतिक महाजन, मंगलाबाई दतात्रय बडगुजर, सचिव सुधाकर मुलचंद पाटील उपस्थित होते. मधुकर यशवंत पाटील यांच्या बिनविरोध निवडीबद्दल मा. मंत्री (मदत पुनर्वसन आणि आपत्ती व्यवस्थापन) आमदार अनिल भाईदास पाटील, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष भागवत पाटील, माजी राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष महेंद्र बोरसे, एल. टी. पाटील, नगरसेविका जयश्नीताई पाटील, मुरलीधर महाजन यांच्यासह गावातील, परिसरातील आणि तालुक्यातील अनेकांनी अभिनंदन केले आहे.

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *