श्री संत सावता माळी गणेश मित्र मंडळाच्या अध्यक्षपदी विजय महाजन

अमळनेर (प्रतिनिधी) : अमळनेर येथील श्री संत सावता माळी गणेशोत्सव मंडळाची सन २०२६-२७ ची नवीन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. मंडळाच्या सभेत सलग चौथ्यांदा विजय महाजन यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी नाना महाजन, तर सचिवपदी जगदिश माळी व योगेश पाटील यांची निवड करण्यात आली.

मंडळाची सभा ज्येष्ठ सभासद नागराज माळी सर, सुरेश सोनवणे, सुनिल पाटील, अरविंद पाटील, निलेश माळी, प्रदिप माळी आणि अशोक महाजन यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी मंडळाच्या आगामी गणेशोत्सवाच्या नियोजनाबाबत चर्चा करण्यात आली तसेच नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. मंडळाच्या सदस्यपदी ज्ञानेश्वर मराठे, प्रशांत माळी, दिनेश पाटील, दिपक माळी, धनंजय बारी, निलेश माळी, प्रदिप माळी, नानु माळी, भावेश वाघ, प्रकाश मोरे, भुषण माळी, मिलींद माळी, यश माळी, सोनु वाघ, योगेश बारी आणि चेतन माळी यांची निवड करण्यात आली. श्री संत सावता माळी गणेशोत्सव मंडळाचे हे ३४ वे वर्ष असून, दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्यासाठी विविध धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. नवीन कार्यकारिणीची निवड झाल्यानंतर मंडळाच्या सर्व सभासदांनी नूतन पदाधिकारी व सदस्यांचे अभिनंदन केले.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *