वाहनांमध्ये गुरांची क्रूरपणे वाहतूक करणाऱ्या शिरपूर तालुक्यातील दोघांवर पोलिसांनी केली कारवाई

अमळनेर (प्रतिनिधी) पोलिसांनी वाहनांमध्ये गुरांची क्रूरपणे वाहतूक करणाऱ्या शिरपूर तालुक्यातील दोघांना ताब्यात घेऊन कारवाई केली.  त्यांच्याजवळील दोन्ही वाहने आणि गुरे मिळून ५ लाख ८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई ९ रोजी सकाळी १० वाजता करण्यात आली.

याबाबत अधिक माहिती अशी की, वाहतूक पोलीस विलास बागुल याना सुभाष चौकात वाहन (क्रमांक एमएच १८, एए ४२६१) व वाहन (क्रमांक जीजे २६ ,टी ७४४६ ) मध्ये चार बैल दाटीवाटीने विना परवाना गुरांना त्रास होईल, अशा पद्धतीने वाहतूक करताना आढळून आले. पोलिसांनी त्यांना त्यांची नावे विचारली असता त्यांनी अब्राम जहुर शेख (वय २५) आणि सतीश कैलास थोरात (वय ३५ दोन्ही रा. शिरपूर) अशी सांगितली. पोलिसांनी प्राण्यांना क्रूरतेने वागणूक देणाऱ्यास प्रतिबंधक कायदा कलम ११(द)(ई)(फ)(क), भारतीय न्याय संहिता कलम ३(५ ) सह मुंबई पोलीस कायदा कलम ११९ प्रमाणे गुन्हा दाखल केला. तपास हेडकॉन्स्टेबल विनोद भोई करीत आहेत.

 

अशी केली कारवाई

 

पोलिसांनी ४८ हजाराची चार बैल ,२ लाख १० हजारचे वाहन तसेच दुसरे २ लाख ५० हजाराचे वाहन असा एकूण ५ लाख ८ हजाराचा मुद्देमाल जप्त केला.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *