
टायर फुटून ‘छोटा हत्ती’ पलटी; उपचारादरम्यान २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू
अमळनेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील सारबेटे गावाजवळ टायर फुटल्याने ‘छोटा हत्ती’ वाहन पलटी होऊन झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या गोलू पठाण (वय २२) या तरुणाचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. सोमवारी सायंकाळी सुमारे ७ वाजता हा अपघात झाला. या घटनेने सारबेटे गावासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार, गोलू पठाण हा सोमवारी सायंकाळी ‘छोटा हत्ती’ वाहनातून प्रवास करीत होता. सारबेटे गावाजवळ वाहनाचा अचानक टायर फुटल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि वाहन पलटी झाले. या अपघातात गोलू पठाण गंभीर जखमी झाला.
अपघातानंतर त्याला तातडीने अमळनेर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र त्याची प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी धुळे येथे हलविण्याचा सल्ला दिला. त्यानंतर त्याला धुळे येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. धुळे येथील रुग्णालयात उपचार सुरू असतानाच मंगळवारी सकाळी गोलू पठाण याची प्राणज्योत मालवली. तरुणाच्या अचानक झालेल्या मृत्यूने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, सारबेटे गावासह परिसरात शोककळा पसरली आहे.

Leave a Reply