डॉ. विशाल शेलकर एम.एस. ऑर्थोपेडिक्समध्ये प्रथम श्रेणीत उत्तीर्ण लवकरच अमळनेरमध्ये मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू करून रुग्णसेवा करण्याचा मानस

अमळनेर (प्रतिनिधी )येथील डॉ. विशाल राजेंद्र शेलकर यांनी वैद्यकीय क्षेत्रात यश संपादन केले असून, SVS Medical College मधून एम.एस. ऑर्थोपेडिक्स (अस्थिरोगतज्ज्ञ) ही पदव्युत्तर वैद्यकीय पदवी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केली आहे. त्यांच्या या यशामुळे अमळनेरच्या वैद्यकीय क्षेत्रात आनंदाचे वातावरण असून, माळी समाजासह मित्रपरिवाराकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. डॉ. विशाल शेलकर हे अमळनेरचे माजी उपनगराध्यक्ष रामदास दौलत शेलकर यांचे नातू, तर अमळनेर नगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र शेलकर आणि सौ. लता शेलकर यांचे धाकटे चिरंजीव आहेत.

 

वैद्यकीय सेवेचा समृद्ध वारसा

 

डॉ. शेलकर यांच्या कुटुंबात वैद्यकीय सेवेचा समृद्ध वारसा आहे. त्यांचे मोठे बंधू डॉ. तुषार राजेंद्र शेलकर हे त्वचारोगतज्ज्ञ आहेत, तर त्यांच्या वहिनी डॉ. शीतल तुषार शेलकर या एमबीबीएस, डीओएमएस (डीएनबी) पदवीधारक नेत्ररोगतज्ज्ञ आहेत.

तसेच, त्यांचे आतेभाऊ डॉ. उप्लेश संतोष महाजन हे स्त्रीरोगतज्ज्ञ, डॉ. पंकज संतोष महाजन हे औषधोपचारतज्ज्ञ, तर डॉ. मयूर संतोष महाजन हे भूलतज्ज्ञ आहेत. हे सर्वजण अमळनेर येथे गणपती हॉस्पिटलच्या माध्यमातून रुग्णसेवा करीत आहेत.

अमळनेरकरांच्या सेवेसाठी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल उभारणार

पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर डॉ. विशाल शेलकर यांनी अमळनेर शहरातच वैद्यकीय सेवा देण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. लवकरच मराठा मंगल कार्यालयाजवळील कृषी विभागाच्या इमारतीत मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू करण्याचा त्यांचा मानस आहे. या माध्यमातून अमळनेर आणि परिसरातील नागरिकांना दर्जेदार वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्याचा त्यांचा प्रयत्न राहणार आहे.

उच्च वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर आपल्या जन्मभूमीतच रुग्णसेवा करण्याचा निर्णय घेतल्याने डॉ. विशाल शेलकर यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांच्या या यशाबद्दल माळी समाज, नातेवाईक आणि मित्रपरिवाराने अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *