महिलेला घरात एकटी पाहून घुसला; पती येताच सुटका, आरोपीला न्यायालयीन कोठडी

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील निम येथे महिला घरात एकटी असल्याची संधी साधून घरात घुसत तिच्याशी अंगलट केल्याची घटना ११ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजता घडली. भगवान दत्तू कोळी असे आरोपीचे नाव असून, महिलेचा आवाज ऐकून तिचा पती घरात आल्याने पुढील अनर्थ टळला. याप्रकरणी मारवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, न्यायालयाने आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, निम येथे संबंधित महिला घरात एकटी असल्याची संधी साधून भगवान दत्तू कोळी याने घरात प्रवेश केला. त्यानंतर ‘तू मला आवडते’ असे म्हणत त्याने महिलेशी अंगलट केली. या प्रकारामुळे महिलेने आवाज दिला. तिचा आवाज ऐकून पती घरात आल्याने महिलेची सुटका झाली. या घटनेमुळे परिसरात चर्चा सुरू झाली. या प्रकरणी भगवान दत्तू कोळी याच्याविरुद्ध मारवड पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहितेच्या कलम ७६, ३३३ आणि ३५१(२) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तपासाधिकारी सहायक पोलीस उपनिरीक्षक संजय पाटील यांनी आरोपीला न्यायालयात हजर केले. न्यायालयाने आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *