
बोरी नदीपात्रात पोहण्यासाठी गेलेल्या १२ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील कन्हेरे येथील बोरी नदीपात्रात पोहण्यासाठी गेलेल्या १२ वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. दक्ष राजेंद्र नेरकर असे मृत मुलाचे नाव असून तो कै. जगन्नाथ धोंडू पाटील यांचा नातू होता. या घटनेमुळे नेरकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून कन्हेरे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दक्ष राजेंद्र नेरकर हा बोरी नदीपात्रात गेला असता पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला. ही घटना लक्षात येताच स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत त्याचा शोध सुरू केला. शोधमोहीमेदरम्यान दक्षला नदीपात्रातून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर त्याला तातडीने दवाखान्यात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर दक्ष राजेंद्र नेरकर याला मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच परिसरात शोककळा पसरली. दक्षच्या दुर्दैवी मृत्यूने नेरकर कुटुंबीयांवर मोठे संकट कोसळले असून, कन्हेरे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

Leave a Reply