
प्रतापनगरातून वृद्ध बेपत्ता; अपहरणाचा गुन्हा दाखल
अमळनेर (प्रतिनिधी) गलवाडे रस्त्यावरील प्रतापनगर परिसरातून ६५ वर्षीय वृद्ध अचानक बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी नातेवाईक मनीषा परब यांनी अमळनेर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल केला असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मोहन रघुनाथ वारंग (वय ६५) हे २० तारखेला सकाळी ९ वाजेच्या सुमारास अचानक निघून गेले. त्यांचे घर पडलेले असल्याने ते शेजारी राहणाऱ्या नातेवाईकाच्या ओट्यावर वास्तव्यास होते. ते अचानक बेपत्ता झाल्याने नातेवाईक मनीषा परब यांनी गावात सर्वत्र शोधाशोध केली; मात्र ते मिळून आले नाहीत. त्यामुळे कोणीतरी त्यांना फूस लावून पळवून नेल्याची खात्री झाल्याने मनीषा परब यांनी अमळनेर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास हेडकॉन्स्टेबल विजय सोनवणे करीत आहेत.

Leave a Reply