अमळनेरमध्ये श्रीराम नवमी निमित्ताने २६ रोजी मिरवणुकीसह विविध कार्यक्रम

पारंपरिक वाद्य, आदिवासी नृत्य आणि वारकरी टाळ-मृदंगाचा गजर

 

अमळनेर (प्रतिनिधी) : शहरात श्रीराम नवमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी सार्वजनिक श्रीराम नवमी उत्सव समितीची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत यंदाच्या श्रीराम नवमी उत्सवानिमित्ताने २६ मार्च रोजी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

समितीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य मिरवणूक काढण्यात येणार असून या मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांचा गजर, आदिवासी नृत्याचे आकर्षक सादरीकरण, लहान मुलांचे कला-कौशल्याचे कार्यक्रम तसेच वारकरी संप्रदायातील टाळ-मृदंगाच्या गजरात भजन-कीर्तन असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. त्यामुळे यंदाची श्रीराम नवमी मिरवणूक अधिक आकर्षक व उत्साहपूर्ण होणार असल्याची माहिती समितीच्या सदस्यांनी दिली. या मिरवणुकीत शहरातील विविध मंडळे, धार्मिक संस्था आणि भाविकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग अपेक्षित असून श्रीराम भक्तांच्या जयघोषाने संपूर्ण शहर भक्तिमय वातावरणात रंगून जाणार आहे. पारंपरिक संस्कृती आणि धार्मिक परंपरांचा संगम घडवून आणणारा हा उत्सव दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. या भव्य मिरवणुकीत सर्व श्रीराम भक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन मिरवणुकीची शोभा वाढवावी, असे आवाहन सार्वजनिक श्रीराम नवमी उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *