
नवीन सभासद नोंदणीबाबत अफवांवर विश्वास ठेवू नका; खानदेश शिक्षण मंडळाचे स्पष्टीकरण
अमळनेर (प्रतिनिधी) खानदेश शिक्षण मंडळ, अमळनेर यांच्या नवीन सभासद नोंदणीसंदर्भात सोशल मीडियावर विविध संदेश प्रसारित होत असल्याच्या पार्श्वभूमीवर संस्थेने अधिकृत स्पष्टीकरण प्रसिद्ध करून नागरिकांना अफवांपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे.
संस्थेचे चिटणीस प्रा. पराग पी. पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, खानदेश शिक्षण मंडळात नवीन सभासद बनविण्याबाबत अथवा त्यासाठी अर्ज स्वीकारण्याबाबत अद्याप संस्थेने कोणताही अधिकृत निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे सोशल मीडियावर प्रसारित होणाऱ्या कोणत्याही संदेशांवर अथवा अफवांवर विश्वास ठेवू नये आणि त्यास बळी पडू नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे. संस्थेने पुढे म्हटले आहे की, नवीन सभासद नोंदणीसंदर्भात भविष्यात कोणताही निर्णय झाल्यास त्याची माहिती खानदेश शिक्षण मंडळामार्फत अधिकृतपणे जाहीर करण्यात येईल. तोपर्यंत नागरिकांनी आणि इच्छुकांनी केवळ संस्थेच्या अधिकृत सूचनांवरच विश्वास ठेवावा, असे आवाहनही प्रा. पराग पी. पाटील यांनी केले आहे.

Leave a Reply