पूर्णवाद परिवारातर्फे ओमप्रकाश मुंदडा, डॉ. अविनाश जोशी पुरस्काराने सन्मानित

अमळनेर भूषण व  सेवाव्रती पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात

 

अमळनेर (प्रतिनिधी) येथील जीवन कला संस्कार केंद्र  व श्री पारनेरकर गुरु सेवा मंडळाच्या संयुक्त विद्यमाने सन २०२५-२६ या वर्षातील ‘अमळनेर भुषण पुरस्कार’ ओमप्रकाश मुंदडा तर ‘घ.भी. धांडे सेवाव्रती पुरस्कार’ डॉ. अविनाश जोशी यांना देऊन गौरवण्यात आले.

अमळनेर येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह येथे पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख अतिथी म्हणून जळगाव येथील केशवस्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. भरत अमळकर होते. अध्यक्षस्थानी गुणेश पारनेरकर होते. पुरस्कारार्थी ओमप्रकाश मुंदडा व डॉ. अविनाश जोशी यांनी मनोगत व्यक्त केले.

डॉ. अमळकर यांनी केशव स्मृती समूहाच्या सामाजिक कार्याचा परिचय करून दिला व उपस्थितांशी संवाद साधला. गुणेश पारनेरकर यांनी त्यांचे प्रबोधनात व्यक्तीची उन्नती ही समाज उन्नती होण्यासाठी आवश्यक आहे. संस्कार व संस्कृती यातील फरक विषद करून त्यांनी मार्गदर्शन केले की संस्कार हे व्यक्तीवर होतात तर, संस्कृतीचे दर्शन समाजातून होते. केवळ सामाजिक विकास हे ध्येय न ठेवता व्यक्ती, व्यक्तित्व व व्यक्तिमत्व घडवणे गरजेचे असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले. या वेळी अनेक मान्यवर व्यक्तींचे सत्कार करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला योगेश पाटील यांचे मधुर बासरी वादन झाले.  जीवन कला संस्कार केंद्राचे अध्यक्ष डॉ.अशोक रावेरकर मंचावर उपस्थित होते. या वेळी अमळनेर, सावदा, जळगाव व धुळे येथील सर्व शिष्यवृंद मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. पपीता जोशी यांनी सूत्रसंचलन केले.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *