
अमळनेरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा 27 वा वर्धापनदिन उत्साहात साजरा
अमळनेर (प्रतिनिधी): राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या 27 व्या वर्धापनदिनानिमित्त अमळनेर येथील पक्ष कार्यालयात माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ध्वजारोहणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
तालुकाध्यक्ष भागवत पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. पक्ष कार्यालयासमोर आकर्षक रांगोळी साकारण्यात आली होती.
ध्वजारोहणानंतर भागवत पाटील यांनी स्वर्गीय अजित दादा पवार यांच्या कार्याचा आढावा घेत त्यांच्या योगदानाला उजाळा दिला. तसेच अमळनेर मतदारसंघात आमदार अनिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची संघटनात्मक ताकद कशी वाढली, याची माहिती देत भविष्यात सर्व संस्थांवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवण्याचा विश्वास व्यक्त केला. यावेळी कार्यकर्त्यांनी “राष्ट्रवादीचा जयघोष” करत वातावरण दणाणून सोडले.
या कार्यक्रमाला जेष्ठ नेत्या सौ. तिलोत्तमा पाटील, ग्रंथालय सेलच्या प्रदेश पदाधिकारी सौ. रिता बाविस्कर, लोकनियुक्त सरपंच श्रीमती राजश्री पाटील, महिला तालुकाध्यक्ष प्रा. मंदाकिनी भामरे, विधानसभा क्षेत्रप्रमुख प्रा. सुरेश पाटील, शहराध्यक्ष चेतन राजपूत, कार्याध्यक्ष सुनिल काटे, विनोद कदम, शेतकी संघ संचालक संजय पुनाजी पाटील, विक्रांत पाटील, रणजित पाटील, युवक जिल्हाध्यक्ष भूषण भदाणे, युवक शहराध्यक्ष पंकज साळी, शिवाजीराव पाटील, कामगार नेते एल. टी. पाटील, जितेंद्र ठाकूर, माजी शहराध्यक्ष मुक्तार खाटीक, नगरसेवक नरेंद्र संदानशीव, भरत ललवाणी, सचिन पाटील, अलीम मुजावर, चंद्रकांत पाटील, भूषण पाटील, सनी गायकवाड, सौ. भारती शिंदे, योगेश पाटील, राहुल गोत्राळ, महारु पाटील, हिंमत पाटील, निलेश देशमुख यांच्यासह बाजार समिती व शेतकी संघाचे पदाधिकारी, आजी-माजी जि.प. व पं.स. सदस्य, नगरसेवक तसेच ग्रामीण व शहरी भागातील अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी पक्षाच्या वाढीसाठी व जनसेवेच्या ध्येयासाठी एकजुटीने काम करण्याचा संकल्प केला.

Leave a Reply