
प्रभाग क्रमांक १७ मध्ये एस.आय.आर. विशेष मतदार पुनरिक्षण मोहीम उत्साहात
अमळनेर (प्रतिनिधी) भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राबविण्यात आलेली एस.आय.आर. (विशेष सघन मतदार पुनरिक्षण) मोहीम प्रभाग क्रमांक १७ मधील बुथ क्रमांक २०० आणि २०२ येथे उत्साहात व यशस्वीरीत्या पार पडली. श्रीकृष्ण मंदिराजवळील पालन हार इंटरप्रायझेस येथे आयोजित या मोहिमेत नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत मतदार यादीतील नावांची पडताळणी, आवश्यक दुरुस्ती तसेच नव्या नोंदणीसाठी अर्ज सादर केले.
प्रत्येक पात्र नागरिकाचा मतदानाचा हक्क अबाधित राहावा आणि एकही पात्र मतदार मतदार यादीपासून वंचित राहू नये, या उद्देशाने ही विशेष मोहीम राबविण्यात आली. मोहिमेदरम्यान मतदारांना आवश्यक कागदपत्रांबाबत मार्गदर्शन करण्यात आले तसेच नावातील त्रुटी, पत्ता बदल, नव्याने नाव समाविष्ट करणे आदी प्रक्रिया सुलभपणे पूर्ण करण्यात आल्या. या मोहिमेस बुथ क्रमांक २०२ चे बीएलओ शेख सर तसेच बुथ क्रमांक २०० चे बीएलओ मोरे सर यांचे विशेष मार्गदर्शन व सहकार्य लाभले. याशिवाय कैलास सोनार, किशोर बारी, प्रकाश सोनार आणि कांबळे दादा यांनी नागरिकांना आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून देण्यासाठी मोलाचे सहकार्य केले. या उपक्रमामुळे अनेक नागरिकांची मतदार नोंदणी, नावातील दुरुस्ती तसेच इतर आवश्यक कामे सुलभपणे पूर्ण झाली. त्यामुळे मतदार यादी अधिक अचूक व अद्ययावत होण्यास मदत झाली असून लोकशाही प्रक्रियेत नागरिकांचा सहभाग वाढविण्यास या मोहिमेचा हातभार लागला. साधू पाण्याला”मतदार राजा जागा हो… एस.आय.आर.चा धागा हो!” या घोषवाक्याने जनजागृती करत राबविण्यात आलेल्या या मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. प्रत्येक पात्र नागरिकाने मतदार म्हणून नाव नोंदवून लोकशाही अधिक सक्षम करण्यासाठी आपले कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

Leave a Reply