
तांदळीत जुन्या भांडणातून चौघांची एकाला मारहाण; डोक्याला दुखापत, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
अमळनेर (प्रतिनिधी) : मागील भांडणाच्या कारणावरून चौघांनी एकाला मारहाण करून जखमी केल्याची घटना २६ रोजी रात्री पावणे दहा वाजेच्या सुमारास तांदळी येथे घडली. याप्रकरणी दिशांत रामदास पाटील यांनी मारवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की फिर्यादीनुसार, २६ रोजी रात्री पावणे दहा वाजता दिशांत रामदास पाटील हे काकांच्या घरी असताना त्यांना घरासमोर गर्दी दिसली. त्यामुळे ते चुलत भाऊ संदीप याला घेऊन घरी आले. त्यावेळी गावातील कुणाल उदयसिंग परदेशी, देवान उदयसिंग परदेशी, आशाबाई उदयसिंग परदेशी व उदयसिंग परदेशी हे त्यांच्या आईला शिवीगाळ करीत असल्याचे दिसले. कुणाल हा त्यांच्या आईला चापटा-बुक्क्यांनी मारहाण करीत होता. यावेळी झालेल्या झटापटीत दिशांत यांच्या गळ्यातील सोन्याची माळ गहाळ झाली. त्याचवेळी कुणाल याने हातातील कड्याने संदीप यांच्या डोक्यावर मारून दुखापत केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. दिशांत रामदास पाटील यांच्या फिर्यादीवरून कुणाल उदयसिंग परदेशी, देवान उदयसिंग परदेशी, आशाबाई उदयसिंग परदेशी व उदयसिंग परदेशी यांच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता कलम ११८(१), ११५, ३५२ व ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हेडकॉन्स्टेबल सुनील पाटील करीत आहेत.

Leave a Reply