
लायन्स क्लब अमळनेरतर्फे डॉक्टर, चार्टर्ड अकाउंटंट व प्रगतशील शेतकऱ्यांचा गौरव
अमळनेर (प्रतिनिधी) लायन्स क्लब अमळनेरच्या वतीने नर्मदा फाऊंडेशन येथे आयोजित विशेष सन्मान सोहळ्यात समाजसेवा, वैद्यकीय, आर्थिक आणि कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या डॉक्टर, चार्टर्ड अकाउंटंट आणि प्रगतशील शेतकरी बांधवांचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लायन्स क्लब अमळनेरचे अध्यक्ष जितेंद्र पारख होते. यावेळी क्लबचे सचिव जयेश गुजराथी, खजिनदार कुमारपाल कोठारी यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी मान्यवरांचा शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना मान्यवरांनी समाजाप्रती निष्ठा, सेवाभाव आणि विविध क्षेत्रांतील योगदानामुळेच समाजाची प्रगती शक्य होत असल्याचे सांगितले. सन्मानित व्यक्तींचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी असून, हा सत्कार त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा छोटासा प्रयत्न असल्याची भावना आयोजकांनी व्यक्त केली. भविष्यातही अशा समाजोपयोगी उपक्रमांसाठी सर्वांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभत राहील, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली. या प्रसंगी डॉ. संदीप जोशी, डॉ. मिलिंद नवसारिका, डॉ. नरेंद्र महाजन, डॉ. किशोर शाह, डॉ. युसुफ पटेल, डॉ. बी. आर. बाविस्कर, डॉ. रवींद्र जैन, डॉ. निखिल बहुगुणा, चार्टर्ड अकाउंटंट राजेश शाह, चार्टर्ड अकाउंटंट अजय हिंदुजा, चार्टर्ड अकाउंटंट रुपेश मकवाणा तसेच प्रगतशील शेतकरी एच. डी. भरुचा, सुशील जैन, योगेश मुंदडा, सुनील चौधरी, प्रितेश पारख, जितेंद्र जैन आणि दिनेश मणियार यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी डॉ. किशोर शाह, अजय हिंदुजा आणि योगेश मुंदडा यांनी मनोगत व्यक्त करून समाजहितासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जितेंद्र पारख यांनी केले. सूत्रसंचालन अजय हिंदुजा यांनी केले, तर आभार जयेश गुजराथी यांनी मानले.

Leave a Reply