अमळनेरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर प्रवेशद्वार उभारणीस मंजुरी

आमदारांच्या प्रयत्नामुळे समाजासाठी अभिमानाचा क्षण : बाबासाहेब आंबेडकर सामाजिक परिषद

अमळनेर (प्रतिनिधी) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर भव्य प्रवेशद्वार उभारण्यास शासन स्तरावर मंजुरी मिळाली आहे. यासाठी ५० लाख रुपये मंजूर झाले आहेत, अशी माहिती डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक परिषदेच्या वतीने देण्यात आली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक परिषदेच्या सर्व पदाधिकारी व समाजबांधवांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे आणि माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या सक्षम प्रयत्नाने याला यश आले आहे. या संदर्भात अध्यक्ष नरेंद्र संदानशिव, ऍड.एस.एस. ब्रह्मे, प्रा. विजय तूंटे, प्रा. हर्षवर्धन जाधव, प्रा. विजय खैरनार, प्रा. राहुल निकम, प्रा. माधव भुसणार, प्रा. भानुदास गुलाले, प्रा. जितेंद्र संदानशिव, प्रा. विजय वाघमारे, प्रा. रवि बावस्कर, बौद्धचार्य बापुराव संदानशिव, बौद्धचार्य निकम, बौद्धचार्य अरुण घोलप, बौद्धचार्य डी. आर. सैंदाणे, बौद्धचार्य मैराळे, आयु. राजू भालेराव, अर्जुन कढरे, ऍड. प्रशांत संदानशिव, विजय संदानशिव, किरण संदानशिव,विनोद बिऱ्हाडे,ज्ञानेश्वर संदानशिव, संजय बिऱ्हाडे,गोकुळ बिऱ्हाडे,समाधान बिऱ्हाडे,गोपीचंद चव्हाण,भरत सोनवणे, सतीश सोनवणे,गौतम सोनवणे, मंगल सपकाळे,दिनेश बिऱ्हाडे, सुरेश वानखेडे, चंद्रकांत संदानशिव,भरत सरदार, सिद्धार्थ मोरे,अशोक महाजन संदानशिव, प्रा. कृष्णा संदानशिव,आकाश संदानशिव,राजेंद्र संदानशिव,शांताराम संदानशिव,शुभम घोलप व इतर सर्व समाजबांधवांनी वर्षभरापूर्वी आमदार अनिल पाटील यांच्याकडे निवेदन सादर केले होते. या मागणीचा त्यांच्याकडून सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. त्यानंतर दिनांक २४ जुलै २०२४ रोजी शासन स्तरावर मंजुरी मिळून, दिनांक २९ डिसेंबर २०२५ रोजी प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे. या प्रकल्पासाठी ५० लाख रुपये मंजूर झाले असून, त्यामुळे लवकरच डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर भव्य प्रवेशद्वार प्रत्यक्षात उभारले जाणार आहे. हा निर्णय अमळनेर परिसरासाठी व संपूर्ण समाजासाठी अभिमानास्पद ठरणार आहे. या ऐतिहासिक यशामागे माजी नगरसेवक नरेंद्र संदानशिव यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचा मोठा वाटा असून, आमदार अनिल पाटील यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे हे स्वप्न साकार झाले आहे. दिनांक 18 फेब्रुवारी 2025 रोजी हा निर्णय प्रत्यक्षात साकारण्याच्या दिशेने ठोस पाऊल टाकण्यात आले. हा निर्णय समाजाच्या भावनांचा आदर करणारा असून सार्वजनिक वारसा जतन करण्याच्या दृष्टीने उचललेले सकारात्मक व दूरदृष्टीपूर्ण पाऊल असताना काही लोक गैरसमज निर्माण करून श्रेय घेण्याचा प्रयत्न करतात ही खेदजनक बाब  असून खोट्या प्रचाराला थारा देऊ नये असे आवाहन सामाजिक परिषदेतर्फे करण्यात आले आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *