
कोयत्याने जीवघेणा वार करून फरार अमळनेरचा सतू उर्फ चेतन धोबी जेरबंद
जळगाव एमआयडीसी पोलीसात दाखल होता गुन्हा
अमळनेर (प्रतिनिधी) जळगाव तालुक्यातील बोरनार येथील एकावर कोयत्याने जीवघेणा वार करून दुखापत केल्याप्रकरणी वॉन्टेड अमळनेरचा एमपीडीए मधील आरोपी सतू उर्फ चेतन किरण धोबी यास अमळनेर पोलिसांनी अटक करून जळगाव एमआयडीसी पोलिसात रवाना केले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, राकेश जगन्नाथ पाटील (वय-38, व्यवसाय रा. बोरनार ता. जि. जळगाव) याचे त्याच्याच गावात राहणारा प्रेम गोपाल धनगर याचेशी किरकोळ वाद-विवाद झाल्याने त्याचे विरुध्द जळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती, तेव्हा पासुन प्रेम धनगर याचे मनात राकेश विषयी विषयी राग होता. दिनाक 28 डिसेंबर 2025 रोजी रात्री 9.30 वा. राकेश त्याच्या मित्रांसह जेवण झाल्यावर घराबाहेर फिरत असतांना प्रेम धनगर हा त्याचे तीन मित्रासोबत मोटारसायकलवर आला आणि याला संपवा” असे म्हणुन त्याचे मोटर सायकलला खोसलेला कोयता हातात घेवुन राकेशच्या डाव्या पायाच्या शिटवर (कमरेखाली) वार करुन जखमी केले. त्यानंतर आरोपी मोटरसायकलने पसार झाले होते. सदर प्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्ह्याची नोंद होऊन पोलीस आरोपींचा शोध घेत होते. अखेर या गुन्ह्यात राकेश सोबत अमळनेर येथील एमपीडीएचा आरोपी चेतन धोबी सहभागी असल्याचे निष्पन्न झाल्याने आरोपी सत्तू ऊर्फ चेतन किरण धोबी यास पोहवा विनोद सोनवणे, सुनील तेली, अमोल करडईकर यांनी पोलीस निरीक्षक निकम व तसेच डीवायएसपी कोते यांचे मार्गदर्शनाने काल रात्री अटक करून अमळनेर येथे गुन्हा दाखल केल्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्यात जळगाव येथे रवाना केले आहे.

Leave a Reply