राष्ट्रीय पिकल बॉल स्पर्धेत अमळनेरच्या विद्यार्थ्यांची चमक; ब्राँझ पदकासह १४ हजारांचे बक्षीस पटकवले

अमळनेर (प्रतिनिधी) हैदराबाद येथे पार पडलेल्या १२ वर्षांखालील राष्ट्रीय पिकल बॉल स्पर्धेत स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत तृतीय क्रमांक पटकावला आहे. या यशाबद्दल त्यांना ब्राँझ पदकासह १४ हजार रुपयांचे बक्षीस प्राप्त झाले आहे.

या स्पर्धेत देशभरातून सुमारे २००० खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. या कडव्या स्पर्धेत स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलचे प्रथमेश उमेश लोहार व निधीश देविदास पाटील यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत तृतीय क्रमांक मिळवला. त्यांच्या या यशामुळे अमळनेर शहरासह शाळेचे नाव राष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल झाले आहे. विद्यार्थ्यांनी हे यश मार्गदर्शक विजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मिळवले आहे. त्यांच्या मेहनतीमुळे व योग्य प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांनी ही उल्लेखनीय कामगिरी साध्य केली. या यशाबद्दल शाळेचे संस्थापक अध्यक्ष नीरज अग्रवाल, अध्यक्षा सितीका अग्रवाल तसेच मुख्याध्यापक विनोद अमृतकर यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. शाळेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत क्रीडा क्षेत्राला दिलेले प्रोत्साहन यामुळेच विद्यार्थी राष्ट्रीय पातळीवर यश संपादन करत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *