स्वामी हंसानंद तीर्थ महाराजांचा २९ वा संन्यास वर्धापन दिन साजरा

अमळनेर (प्रतिनिधी) कपिलेश्वर मंदिराचे मठाधिपती महामंडलेश्वर स्वामी हंसानंद तीर्थ महाराज यांचा २९ वा संन्यास वर्धापन दिन कपिलेश्वर मंदिरावर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यात ओंकारेश्वर, त्र्यंबकेश्वर, उजैनसह प्रमुख संन्याशांची उपस्थिती होती.

हंसानंद महाराजांचा २९ वर्षाच्या संन्यस्त जीवनाचा आढावा घेवून गौरव करण्यात आला. महाराजांनी त्यांच्या आता पर्यंतच्या शेकडो भाविकांना व्यसन मुक्त केले. रामनामाचा छंद लावला. पाठशाला चालवून शेकडो विद्यार्थ्यांना घडवले. आतापर्यंत १० प्राचिन मंदिरांचा जीर्णोद्धार केला. २९ वर्ष प्रवासाचे अनुभव कथन केले. रामानंद तीर्थ महाराज देवेश्वर तीर्थ स्वामी यांनी महाराजांच्या सानिध्यात खूप काही ज्ञान प्राप्तीचा अनुभव सांगीतला. प्रसंगी ज्येष्ठ विश्वस्त घनश्याम अग्रवाल अमळनेर, विश्वस्त श्री मंगल तात्या पानाचंद पाटील, लादू भिवसन चौधरी, सुदाम पाटील, तुकाराम चौधरी, नामदेव कोळी व पंच क्रोशीचे शेकडो भाविक उपास्थित होते. ट्रस्टचे सचिव मगन भाऊसाहेब यांनी सूत्रसंचलन केले. उपाध्यक्ष सी. एस. पाटील यांनी आभार मानले.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *