
पिंगळवाडे जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन रंगले
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील पिंगळवाडे येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले. स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
या कार्यक्रमाला अमळनेरचे गटविकास अधिकारी एन. आर. पाटील, केंद्रप्रमुख चंद्रकांत साळुंखे, प्रा. पंकज पाटील, मान्यवर, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. विशेषतः विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्यप्रकारांना आणि इतिहासावर आधारित नाटकांना प्रेक्षकांकडून भरभरून दाद मिळाली. इतिहासावर आधारित नाटकांमधून विद्यार्थ्यांनी देशभक्ती आणि शौर्याचा संदेश दिला. तसेच लहान विद्यार्थ्यांनी सादर केलेले नृत्य व गाणी कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव मिळाला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका वंदना ठेंग, सोनाली पाटील, ज्ञानेश्वर महाजन आणि सीमा पाटील यांनी विशेष प्रयत्न केले.

Leave a Reply