अमळगाव येथे पार ओट्याचे लोकार्पणसह गणपती मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात

अमळनेर (प्रतिनिधी)  तालुक्यातील अमळगाव येथे पार ओट्याचे लोकार्पण तसेच नवसाच्या गणपती मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. गावातील नागरिकांच्या उपस्थितीत धार्मिक व भक्तीमय वातावरणात हा सोहळा झाला.

अमळगाव येथील सुपुत्र तथा सध्या पनवेल येथील लाईफ लाईन हॉस्पिटलचे संचालक डॉ. प्रकाश शिवदास भोसले पाटील व डॉ. जयश्री प्रकाश भोसले पाटील यांच्या हस्ते लोकार्पण व प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. यावेळी परभणी येथील डॉ. प्रफुल्ल पाटील, डॉ. म्हस्के, इंजि. दिलीप पाटील, अशोक पाटील (पनवेल), मीनाताई पाटील, पराग बेडसे यांच्यासह त्यांचे कुटुंबीय व मित्रपरिवार उपस्थित होते.

या प्रसंगी अमळगावचे लोकनियुक्त सरपंच इंजि. गिरीश सोनजी पाटील यांच्या रामराजे फाउंडेशन व अमळगाव ग्रामस्थांच्या वतीने डॉ. प्रकाश भोसले व डॉ. जयश्री भोसले यांना “अमळगाव भूषण” पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाला अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती नंदकिशोर पाटील, मार्केटचे उपसभापती सुरेश पिरण पाटील, चोपडा येथील ॲड. संदीप सुरेश पाटील, माजी सरपंच गजानन चौधरी, लक्ष्मण व्यंकट पाटील, सतीश रंगराव पाटील, दीपक भोसले, संजय सुकदेव पाटील, मधुकर यशवंत पाटील, विश्वास पाटील, गजानन वाणी, प्रकाश तुकाराम पाटील, चंद्रकांत पाटील, राजेंद्र पाटील, सुभाष चौधरी, शिवदास चौधरी, शाम चौधरी, हिराबाई नंदकिशोर पाटील, अश्विनी गिरीश पाटील, मंजुषा उल्हास पाटील, रीता बाविस्कर, हिंमतराव पारधी गुरुजी, रमेश यशवंत पाटील, योगेश पाटील, निंबा वाडीले, गोरख धोबी, जयराम चौधरी, अशोक पाटील, राजेंद्र वारुळे आदी मान्यवर उपस्थित होते.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *