हस्ती बँकेच्या अमळनेर शाखेचा वर्धापन दिन मधुमेह तपासणी व रक्तदान शिबिराने साजरा

अमळनेर (प्रतिनिधी) विविध सामाजिक उपक्रमांनी दि हस्ती को-ऑप बँकेच्या अमळनेर शाखेचा १३ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यानिमित्ताने मधुमेह तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजनही करण्यात आले होते.

बँकेचे संस्थापक अध्यक्ष स्व. हस्तीमल जैन यांची प्रेरणा घेऊन स्थापन झालेल्या हस्ती बँकेतर्फे दरवर्षी समाज हितासाठी विविध उपक्रम बँकेमध्ये राबवले जातात. समाजाचे आपण काही देणे लागतो तसेच आपल्यावर या देशाचे, गावाचे व समाजाचे ऋण आहे. या संकल्पनेतून बँकेचे प्रेरणास्थान स्व. शांतीलालजी जैन व स्व. कांतीलालजी जैन सतत समाजहित जपून काम करीत असत, त्या अनुषंगाने प्रत्येक शाखेचा वर्धापन दिवस बँकेचे अध्यक्ष कैलास जैन यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने जीवनज्योती ब्लड सेंटर धुळे यांनी अमळनेर व परिसरातील ७५ नागरिकांची मधुमेह तपासणी मोफत करण्यात आले. या कार्यक्रमाच्या प्रसंगी मधुमेह तपासणी व रक्तदान शिबिराचे उद्घाटन राणू वृषभ पारख, रुपाली चेतनकुमार जैन, जान्हवी सुनीलकुमार माळी, मयुरी अनिकेत पिसे यांनी केले. तसेच या कार्यक्रम प्रसंगी दोंडाईचा मुख्य शाखेचे मा. समिती चेअरमन किशोर शांतीलाल जैन, मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश केसरीमलजी जैन, मुख्य कार्यालयाचे वरिष्ठ अधिकार अमर हरिदास छाबडिया, अमळनेर शहराचे उद्योजक ओमप्रकाश नारायणदास मुंदडा, नीरज अग्रवाल, किर्तिकुमार कोठारी, दिलीप जैन, प्रतीक जैन, जितेंद्र गोहिल, प्रवीण जैन, आदी समवेत मान्यवरांच्या उपस्थिती करण्यात आले. तसेच सामाजिक उपक्रमात नवजीवन ब्लड सेंटर व जीवनज्योती ब्लड सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने ५६ रक्तदात्यांचे रक्त संकलन करण्यात आले.  कार्यक्रमासाठी मोठ्याप्रमाणात अमळनेर व पंचक्रोशीतील प्रतिष्ठित व्यापारी वर्ग, सभासद, खातेदार, हितचिंतक इ. प्रतिष्ठित मान्यवरांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली. याप्रसंगी अमळनेर शाखा समितीचे व्हा. चेअरमन वृषभ प्रकाश पारख यांनी बँकेच्या प्रगतीबद्दल आणि समाजासाठी केलेल्या विविध कार्याबद्दल माहिती दिली. उपस्थित शाखेचे समिती चेअरमन अशोककुमार जैन व समिती सदस्य शिरीष पाटील, चेतन जैन, भरतकुमार पंजाबी, लखपतराज बाफना, पंकज वाणी तसेच शाखेचे शाखा व्यवस्थापक सुनिलकुमार माळी आदी उपस्थित होते. शिबिरासाठी बँकेचे संचालक संजय दुग्गड, (रक्तप्रकल्प प्रमुख) यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच बँकेचे कर्मचारी मयुरी कुलकर्णी, रोहित महाजन, उज्वल येवले, गिरीश चित्ते, चेतन लाड, प्रशांत जोहरी व पिग्मी एजंट आदी कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वी पार करण्यासाठी परिश्रम घेतले.

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *