
मराठा समाज महिला मंडळाच्या अध्यक्षपदी सुलोचनाताई वाघ
अमळनेर (प्रतिनिधी) येथील मराठा समाज महिला मंडळाच्या अध्यक्षपदी सुलोचनाताई वाघ यांची निवड करण्यात आली. गेल्या दहा वर्षांपासून कार्यरत असलेल्या या मंडळात त्यांच्या निवडीचे सर्वत्र स्वागत करण्यात आले.
सुलोचनाताई वाघ या उच्चशिक्षित असून त्यांनी मराठी व राज्यशास्त्र विषयात एम.ए. व बी.एड. पदवी प्राप्त केली आहे. त्या सध्या जळगाव जिल्हा इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. तसेच जळगाव जिल्हा मजूर फेडरेशनच्या संचालिका म्हणूनही त्या कार्य पाहत आहेत. गेल्या २० वर्षांपासून महिला दक्षता समितीच्या माध्यमातून महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी विशेष कार्य केले आहे. याशिवाय ह्यूमन राईट्स प्रोटेकशन कमिटी , दिल्लीच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदीही त्यांची निवड झाली आहे. गेल्या २५ वर्षांपासून सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय असलेल्या वाघ यांच्या निवडीबद्दल विविध मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. येत्या २०२६ वर्षात महिलांसाठी आरोग्य, व्यवसाय व कला क्षेत्रात विविध उपक्रम राबविणे, तरुणांना मार्गदर्शन करणे तसेच महिलांवरील अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्याचा संकल्प त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Leave a Reply