
गुरुपौर्णिमेनिमित्त अमळनेरमध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिर
अमळनेर (प्रतिनिधी) “यामिनी स्वस्त औषधी सेवा जनरिक मेडिसिन स्टोअर्स” यांच्या वतीने गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने १९ मार्च रोजी नागरिकांसाठी भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमामुळे परिसरातील नागरिकांना प्राथमिक आरोग्य तपासणीची उत्तम संधी उपलब्ध होणार आहे.
शिबिर सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात रक्तदाब (ब्लड प्रेशर), शुगर (रँडम शुगर) तसेच वजन यांची मोफत तपासणी केली जाणार आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे वाढत असलेल्या आजारांच्या पार्श्वभूमीवर हा उपक्रम नागरिकांसाठी उपयुक्त ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
“यामिनी स्वस्त औषधी सेवा जनरिक मेडिसिन स्टोअर्स” हे बोरि पेट्रोल पंपाजवळ, व्हाईट बिल्डिंग समोर, अमळनेर येथे स्थित आहे. गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छांसह आयोजित करण्यात आलेले हे शिबिर नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने लाभदायक ठरणार असून जास्तीत जास्त नागरिकांनी या मोफत आरोग्य तपासणीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Leave a Reply