
हिंदू नववर्ष स्वागत यात्रेनिमित्त रविवारी अमळनेरात होणार बैठक
अमळनेर (प्रतिनिधी) हिंदू नववर्ष स्वागत समितीतर्फे यंदाही अमळनेर शहरातील राष्ट्रप्रेमी, धार्मिक व सामाजिक संस्था तसेच विविध मंडळांच्या सहकार्याने गुढीपाडव्याच्या निमित्ताने भव्य हिंदू नववर्ष स्वागत यात्रा काढण्यात येणार आहे. ही यात्रा दिनांक १९ मार्च रोजी आयोजित करण्यात येणार आहे. या यात्रेच्या नियोजन व आयोजनासाठी रविवार दि. १५ मार्च रोजी रात्री ८ वा. बन्सीलाल पॅलेस, अमळनेर येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे.
यंदा या स्वागत यात्रेचे २२ वे वर्ष असून या बैठकीस शहरातील सर्व सामाजिक, धार्मिक संस्था, मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिकांनी मित्रपरिवारासह उपस्थित राहावे, असे आवाहन हिंदू नववर्ष स्वागत समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply