गटारीत पडलेल्या कुत्र्याला अग्निशमन दलाच्या पथकाने दिले जीवदान

अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील मोठ्या गटारीत पडलेल्या एका कुत्र्याला अमळनेर नगरपालिकेच्या अग्निशमन बचाव पथकाने सुखरूप बाहेर काढून जीवदान दिल्याची घटना घडली.

बालेमिया परिसरातील गटारीत सदर कुत्रा पडलेला असल्याची माहिती नागरिक कुसुमताई भाटिया यांनी दूरध्वनीद्वारे पालिकेला दिली. त्यानंतर मुख्याधिकारी गणेश शिंदे यांच्या आदेशानुसार अग्निशमन बचाव पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.

पथकाने प्रयत्नपूर्वक कुत्र्याला गटारीतून बाहेर काढून सुरक्षितरित्या कुसुमताई भाटिया यांच्या ताब्यात दिले. या कार्याबद्दल परिसरातील नागरिकांनी अग्निशमन विभागाचे कौतुक केले. या बचाव मोहिमेत अग्निशमन अधिकारी गणेश गोसावी, आरोग्य निरीक्षक किरण कंडारे तसेच कर्मचारी दिनेश बिऱ्हाडे, जफर पठाण आणि सत्येन संदानशिव यांनी परिश्रम घेतले.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *