
क्रांती दिनानिमित्त अमळनेरातील हुतात्मा स्मारकांना अभिवादन
अमळनेर (प्रतिनिधी) क्रांती दिन व आदिवासी दिनानिमित्त फिनिक्स सोशल अवेअरनेस ग्रुपच्या वतीने अमळनेर शहरातील विविध हुतात्मा व महापुरुषांच्या स्मारकांना पुष्पचक्र व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. फिनिक्स सोशल अवेअरनेस ग्रुपच्या अध्यक्षा ॲड. ललिता पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही हा उपक्रम राबविण्यात आला.
शहरातील तहसील कार्यालयाच्या आवारातील हुतात्मा स्मारक, साने गुरुजी पुतळा, समशेर पारधी स्मारक, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा, राणी लक्ष्मीबाई चौकातील लाल बावटा स्मारक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, पैलाड नाका येथील हुतात्मा स्मारक, अहिल्याबाई होळकर स्मारक, महाराणा प्रताप स्मारक, अण्णा भाऊ साठे स्मारक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा तसेच क्रांतीज्योती महात्मा फुले स्मारक या विविध ठिकाणी पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या वेळी वसुंधरा लांडगे यांनी प्रत्येक स्मारकाजवळ देशभक्तीपर, क्रांतीगीते व समरगीते सादर करून हुतात्मे, स्वातंत्र्यसैनिक आणि महापुरुषांना श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या सुरेल गीतांनी परिसरात देशभक्तीमय वातावरण निर्माण झाले.
क्रांतिकारक, समाजसुधारक आणि महापुरुषांच्या कार्याचे स्मरण करून त्यांच्या विचारांचा संदेश नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
या प्रसंगी फिनिक्स सोशल अवेअरनेस ग्रुपच्या अध्यक्षा ॲड. ललिता पाटील, वसुंधरा लांडगे, डॉ. प्रतिभा मराठे, नगरसेवक योगिताताई कापडने, प्राचार्य निवेदिता पाटील, लताताई पाटील, रेणू प्रसाद, उपनगराध्यक्ष प्रशांत निकाम, पाणीपुरवठा सभापती कैलास पाटील, शिक्षण सभापती नावेद शेख, नगरसेवक पंकज चौधरी, दीपक चौगुले, श्रीराम चौधरी, बाळासाहेब संदानशिव, गोकुळ आबा बोरसे, उषा पवार, भारती कोळी, पराग पाटील, माजी नगराध्यक्ष सुभाष मामा चौधरी, सोमचंद्र काका संदानशिव, पवार आप्पा, प्राचार्य आशिष शर्मा, पन्नालाल मावळे, केदार देशमुख, जावेद पटेल, धनगर सर, नितीन पाटील, गुलाब पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply