
अमळनेरात ५ मार्चला ‘तुकाराम बीज’ निमित्त भव्य पालखीसह कीर्तन सोहळ्याचे आयोजन
अमळनेर (प्रतिनिधी) जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या ३७५ व्या वैकुंठ गमन वर्षानिमित्त अमळनेर येथील कुणबी पाटील समाज बांधवांच्या वतीने मंगळवार, ५ मार्च रोजी जय अंबे मित्र मंडळ, दुर्गेश्वर महादेव मंदिर, शिरुड नाका येथे ‘तुकाराम बीज’ उत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने शहरात पालखी मिरवणूक आणि भव्य हरी कीर्तन सोहळा रंगणार आहे.
श्री जगद्गुरु संत तुकाराम महाराज कुणबी पाटील समाज बहुउद्देशीय मंडळतर्फे सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
पालखी मिरवणुकीला दुपारी ४ वाजता श्री संत सखाराम महाराज वाडी संस्थान मंदिर येथून प्रारंभ होईल. ही मिरवणूक वाडी चौक, पानखिडकी, सराफ बाजार, दगडी दरवाजा, राणी लक्ष्मीबाई चौक, तिरंगा चौक, पवन चौक मार्गे जाऊन दुर्गेश्वर महादेव मंदिर (शिरुड नाका) येथे समाप्त होईल. रात्री ८ ते ११ या वेळेत ह.भ.प. उमेश पाटील महाराज (दहिवद खुर्द) यांचे सुश्राव्य कीर्तन होईल.
कीर्तनापूर्वी सायंकाळी ७ ते ८ या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. पालखी मिरवणुकीत येताना पुरुष बांधवांनी पांढरा शुभ्र पोशाख व पांढरी टोपी परिधान करावी, असे आवाहन कुणबी पाटील समाज बहुउद्देशीय मंडळाने केले आहे.

Leave a Reply