ताडेपुरा भागात नमो गार्डन करण्यास उपनगराध्यक्षांनी दर्शवला विरोध

नमो गार्डन ताडेपुरा भागात नकोच उपनगराध्यक्ष प्रशांत निकम यांची स्पष्ट भूमिका

अमळनेर (प्रतिनिधी )अमळनेर नगरपरिषदेच्या माध्यमातून 1 कोटी निधी नमो गार्डनसाठी मंजूर असल्याने सदरचे गार्डन कोणत्या परिसरात व्हावे याबाबत पालिका सदस्य तथा विरोधक व सत्ताधारी गटात वेगवेगळे मतप्रवाह आहे.विरोधी गट असलेल्या शहर विकास आघाडीने ताडेपुरा तलावाजवळ सुशोभीकरण होत असल्याने याच ठिकाणी नमो गार्डन व्हावे जेणेकरून मंगळग्रह मंदिर, अंबरीश टेकडी आणि ताडे तलाव तिन्ही मिळून हा परिसर पिकनिक स्पॉट ठरेल आणि स्लम भागाचा विकास साधून सौंदर्यकरणात भर पडेल अशी त्यांची भूमिका आहे.
मात्र यासंदर्भात उपनगराध्यक्ष प्रशांत निकम यांनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडताना म्हटले आहे की “नमो गार्डन” ताडेपुरा नाल्याजवळ विकसित करावे अशी विरोधकांची मागणी असली तरी नागरिकांच्या सुरक्षेचा विचार करता त्या परिसरात शहरातील लोक जाणारच नाहीत.खरे पाहता ताडे तलाव हा नैसर्गिक स्रोत नसून ते त्या परिसरातील गटारीचे पाणी साचलेले आहे.त्यामुळे दुर्गंधी व घाणीचा विचार करता तेथे गार्डन विकसित करणे योग्य होणार नाही. त्याऐवजी शहरात चांगल्या परिसरात 40 बाय 60 मीटर आकाराचा चांगला भूखंड शोधून तेथे हे नमो गार्डन विकसित केले जाईल,जेथे लहान मुले व अबाल वृद्ध सुरक्षितपणे जाऊ शकतील व आनंद घेऊ शकतील असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.एकंदरीत ताडेपुरा तलावाजवळ नमो गार्डन चा विषय होणारच नाही हेच त्यांनी स्पष्ट केले असून याबाबत शहरातील नागरिकांची मतेही पालिकेने जाणून घ्यावीत अशी मागणी होत आहे .

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *