मुसळधार पावसाने संकटग्रस्तांना रोटरी क्लब अमळनेरतर्फे फूड पॅकेट व कपड्यांचे वाटप

अमळनेर (प्रतिनिधी )दि. ३१ जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे अमळनेर शहर व परिसरातील अनेक घरांमध्ये पाणी शिरून नागरिकांचे मोठे नुकसान झाले. या संकटग्रस्त कुटुंबांना दिलासा देण्यासाठी रोटरी क्लब अमळनेरतर्फे मदतीचा हात पुढे करण्यात आला.

रोटरी क्लबने नदीकाठ व गांधलीपुरा परिसरातील सुमारे ६० गरजू नागरिकांना अन्नधान्याची फूड पॅकेट्स तसेच लहान बालकांपासून वयोवृद्धांपर्यंत गरजूंसाठी कपड्यांचे वितरण केले. या मदत उपक्रमाला नागरिकांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला.

या सेवाकार्यात रोटरी क्लबचे अध्यक्ष रोटे. महेश पाटील यांच्यासह चेलाराम सैनानी, विजय माहेश्वरी, अभिजीत भांडारकर, डॉ. राहुल मुठे, प्रीतपाल सिंग बग्गा, रोहित सिंघवी, राजेश बेदमुथा, कीर्तीकुमार कोठारी, पूनम कोचर, सौरभ जैन, प्रतिक जैन, देवेंद्र कोठारी, प्रतीक खंडेरिया, विनोद थोरात, सचिन चोपडा, किरण कुंभार,पी.आर.ओ. मकसूद बोहरी तसेच इतर रोटरी सदस्य उपस्थित होते.

प्रकल्प प्रमुख अभिजीत भांडारकर, देवेंद्र कोठारी व रोनक संकलेचा यांच्या मार्गदर्शनाखाली मदत साहित्याचे शिस्तबद्ध वितरण करण्यात आले.

यावेळी बोलताना अध्यक्ष रोटे. महेश पाटील म्हणाले, “संकटाच्या काळात समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे हीच रोटरीची खरी ओळख आहे.”

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *