अमळनेरात श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथीनिमित्त भक्तिमय वातावरण गुरूचरित्र पारायण सोहळा

अमळनेर (प्रतिनिधी) अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त येथील श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक केंद्रात नित्य गुरूचरित्र पारायणाचे आयोजन करण्यात आले असून या धार्मिक सोहळ्याला सेवेकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. दि. ९ एप्रिल ते १५ एप्रिल २०२६ या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमांनी हा उत्सव साजरा होत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,  बुधवार, दि. ९ एप्रिल रोजी सकाळी ध्वजस्थापना, गणेशपूजन, मंडप स्थापना तसेच विविध देवतांची विधिवत पूजाअर्चा करण्यात आली. त्यानंतर दररोज नित्य पूजा, जप, सप्ताह पारायण, भजन-कीर्तन आणि इतर धार्मिक विधी पार पडत आहेत.

सकाळी गुरूचरित्र पारायणास प्रारंभ झाला असून सुमारे ३०० महिला व पुरुष सेवेकरी या पारायणात सहभागी झाले आहेत. दि. १० ते १४ एप्रिलदरम्यान सकाळ व सायंकाळी नियमित पारायण, नामस्मरण, आरती आणि प्रवचनांचे आयोजन करण्यात आले आहे.

दि. १५ एप्रिल रोजी सामूहिक आरती व महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होणार असून या कालावधीत सामूहिक गुरूचरित्र पारायणही पार पडणार आहे. या धार्मिक सोहळ्यामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून भाविकांमध्ये मोठा उत्साह आणि श्रद्धा पाहायला मिळत आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *